Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रचलित शेतीपद्धतीला फाटा देत नर्सरी उभारून केली ५० लाखांची रोपविक्री

najarkaid by najarkaid
April 2, 2023
in Uncategorized
0
प्रचलित शेतीपद्धतीला फाटा देत नर्सरी उभारून केली ५० लाखांची रोपविक्री
ADVERTISEMENT

Spread the love

प्रचलित शेतीपद्धतीला फाटा देत नवनवे प्रयोग व उत्कृष्ट रोपांसाठी स्वत:ची नर्सरी तयार करून मोर्शी तालुक्यातील एका शेतकरी बांधवाने आर्थिक प्रगती साधली आहे.तब्बल ५० लाख रुपयाचे रोपे विक्री करून आर्थिक प्रगती साधली आहे.

शेती विकासासाठी सूक्ष्म सिंचन, नाविन्यपूर्ण पीक, अद्ययावत तंत्रज्ञान अशी विविध प्रयोगशीलता जोपासणे आवश्यक असते. हे लक्षात घेऊन मोर्शी येथील ओमनगरमधील प्रफुल्ल गणपतराव हेलोडे यांनी आपली प्रयोगशीलता व विविध शासकीय उपक्रमांची साथ यांची सांगड घालून उत्कृष्ट शेती फुलवली आहे.

प्रफुल्ल हेलोडे यांनी कृषी विभागाच्या क्रॉपसॅप व पाणलोट प्रकल्पात काही काळ काम केले. त्यांनी नोकरी न करता स्वत: शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्याकडे स्वत:ची शेती नव्हती. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी 17 एकर शेती करार तत्वावर घेतली व या सर्व शेतीत ठिबक सिंचन यंत्रणा बसविली. शेतीत त्यांनी नाविन्यपूर्ण पीके घेतली. दोन एकरात ॲशगार्डच्या (पेठा) लागवडीचा प्रथम प्रयोग केला. त्यात एकरी 25 टन उत्पादन मिळाले. या पिकाचे उत्तम उत्पादन त्यांनी सातत्याने घेतले. नागपुरातील नामांकित खाद्यपदार्थ उद्योगाने त्यांच्याकडून नियमित या उत्पादनाची नियमित खरेदी केली. त्यामुळे हेलोडे यांना चांगले उत्पन्न मिळू लागले.

जैविक शेतीचाही प्रयोग त्यांनी केला. तळणी येथे शेती विकत घेऊन त्यांनी सर्व शेतावर मल्चिंग केले. बांबूच्या शेडवर काकडीचे तीन महिन्याचे पीक घेऊन उत्पादन सातत्य ठेवले.  मल्चिंग पेपरचा वापर संपूर्ण शेतावर आच्छादित ठेवण्यासाठी ट्रॅक्टरचलित मशिन तयार केली.भाजीपाल्याची रोपे स्वत: तयार करता यावी म्हणून त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी नर्सरीला भेटी दिल्या. अभ्यास करून स्वत: रोपे तयार केली. शेतात शेडनेट व पॉलिहाऊस उभारण्यासाठी ‘आत्मा’मार्फत तळेगाव दाभाडे येथे प्रशिक्षण घेतले.

कृषी विभागाच्या एमआयडीएच योजनेच्या माध्यमातून पॉलिहाऊस व शेडनेटची उभारणी केली. त्यात ते मिरची, काकडी, कोबी, टमाटे आदी भाजीपाला रोपे, टरबुज, खरबूज आदी रोपांची निर्मिती करत आहेत. त्यातून त्यांना चांगला नफा मिळू लागला. फुलांचेही उत्पादन त्यांनी घेतले. आपल्या नर्सरीत ते शेतकरी बांधवांना रोपांची विक्रीही करतात. पॉलिहाऊस व शेडनेटनंतर त्यांनी द्वारका हायटेक नर्सरीची उभारणी केली. त्यांची 50 लाखांवर रोपविक्री झाली. आता तर त्यांची वार्षिक उलाढाल दीड- दोन कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. ते शेतकरी बांधवांना विविध पिकांसंदर्भात मार्गदर्शनही करत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन कृषी विभागाने त्यांना उद्यान पंडित म्हणून गौरविले आहे.

हर्षवर्धन पवार, जिल्हा माहिती अधिकारी,

अमरावती

Spread the love
Tags: #sheti #pragatishilshetkari
ADVERTISEMENT
Previous Post

Fake companies ; ११९ खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून एकास अटक

Next Post

खळबळजनक! तरुणीने बनवला आपल्याच मैत्रिणीचा बाथरूममधील आंघोळ करतानाचा व्हिडीओ, अन्…

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Next Post
अरे बापरे.. फॉलोअर्स वाढवण्यासाठी पतीने पत्नीचे आंघोळ करतानाचे अश्लील फोटो-व्हिडीओ फेसबुकवर टाकले

खळबळजनक! तरुणीने बनवला आपल्याच मैत्रिणीचा बाथरूममधील आंघोळ करतानाचा व्हिडीओ, अन्...

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us