Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी माझी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे

najarkaid by najarkaid
July 18, 2019
in राजकारण
0
नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी माझी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे
ADVERTISEMENT

Spread the love

  • पाचोरा येथे जन आशीर्वाद यात्रेचा जोरदार शुभारंभ : प्रचंड जनसमुदायाची उपस्थिती

पाचोरा- मातोश्री वरून बाळासाहेब ठाकरे यांचा नवमहाराष्ट्र घडविण्यासाठीच आशीर्वाद घेऊन निघालो असून ज्यांनी शिवसेनेच्या वाटचालीत व निवडणुकीत शिवसेनेला सहकार्य केले त्यांचे आभार मानण्यासाठी व जे अजूनही शिवसेनेच्या विचारापासून दूर आहेत त्यांची मने जिंकण्यासाठी मी निघालो आहे माझी ही यात्रा कोणत्याही पदासाठी नसून नवा महाराष्ट्र घडविण्याच्या स्वप्नासाठी आहे आपली मने जिंकली म्हणजे महाराष्ट्र जिंकता येईल आपण माझ्यासोबत असाल तर हात उंचावून साद द्या असे विनम्र आवाहन करत उपस्थित शिवसैनिक व श्रोत्यांची साद आणि दाद युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिळवली.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या महाराष्टातील जनसंवाद यात्रेचा शुभारंभ आज गुरुवार दि. 18 रोजी पाचोरा येथून करण्यात आला. या निमित्ताने दुपारी दीड वाजेच्या सुमारास झालेल्या सभेस आदित्य ठाकरे यांच्यासह सेनेचे दिग्गज नेते यावेळी उपस्थिती होते.
आदित्य ठाकरे यांचे जळगावात आगमन झाल्यावर शहरातील इच्छापूर्ती गणपती मंदिरात दर्शन घेतले.त्या नंतर ते पाचोरा येथे सभेस निघाले होते.पाचोरा शहरात आदित्य ठाकरे यांचा ताफा दाखल होताच शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले. जळगाव चौफुली जवळून शिवसैनिकांनी बाईक रॅली काढून त्यांना सभास्थाना पर्यंत आणले छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयास त्यांनी भेट दिली व ते माजी आमदार तथा निर्मल उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक कै. आर. ओ. तात्या पाटील यांच्या निवासस्थानी गेले त्यांची कन्या.वैशाली सूर्यवंशी पत्नी कमल पाटील व जावई अॅड नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांचे सांत्वन करून त्यांनी आर. ओ. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी आदित्य ठाकरे कमालीचे भावुक झाले व तेथून ते कृष्णाजी नगरातील सभास्थानी पोहोचले
गगनभेदी घोषणाबाजीने करत त्यांचे स्वागत करण्यात आले. माजी नगराध्यक्ष तथा आमदार किशोर पाटील यांच्या सौभाग्यवती सुनिता पाटील यांनी त्यांचे औक्षण केले शिवसेना महिला आघाडीच्या सर्व सदस्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दही व साखर देऊन त्यांचे स्वागत केले व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून व नारळ वाढवून जन आशीर्वाद यात्रेचा शुभारंभ झाल्याचे जाहिर करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, नवा महाराष्ट्र घडवायची की हीच योग्य वेळ आहे प्रत्येक माणूस शिवसैनिक व्हावा त्याशिवाय महाराष्ट्र भगवा करता येणार नाही शिवसेनेची विचारधारा सर्वसामान्यांच्या विकास व उद्धारासाठी आहे जेथे त्रास आहे तेथे मदत करणे, अन्याय असेल तेथे न्याय मिळवून देणे यासाठीच शिवसेना कार्य करीत आली असून शेतकरी महिला विद्यार्थी तरुण यांचेसह जातीयवाद दुष्काळ शेती यांच्या न्यायासाठी व भल्यासाठी आवाज उठवण्यात आतापर्यंत शिवसेनाच अग्रभागी राहिली आहे या यात्रेच्या निमित्ताने राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा आशीर्वाद घेऊन त्यांना नवा महाराष्ट्र घडवण्याच्या या अभियानात सहभागी करणे हा उद्देश आहे म्हणून माझी ही यात्रा म्हणजे तीर्थयात्रा आहे असे सांगून तुम्ही यासाठी तयार आहात का ? यासाठी मला आशीर्वाद देणार का ? असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी उपस्थित जनतेला हात उंचावून साथ देण्याचे आवाहन केले त्यावेळी जनतेनेही त्यांना तेवढ्याच मोठ्या संख्येने हात उंचावून साथ दिली मन जिंका म्हणजे राज्य जिंकता येईल येईल या भावनेनेच आपली मने जिंकून आपला आशीर्वाद मिळवणे व आपणाला नवमहाराष्ट्र घडविण्याच्या चळवळीत सहभागी करण्याचा मान मिळवून देणे यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला .
आदित्य ठाकरे यांचे आगमन होण्याअगोदर उपस्थितांना अंजली नाईक रमेश बाफना विलास पारकर गजानन कीर्तिकर यांनी संबोधित केले. याप्रसंगी व्यासपीठावर रामदास कदम, खा.संजय राऊत, मंत्री ना. एकनाथ शिंदे, सहकार राज्य मंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, वरूण सरदेसाई, विलास पारकर, संजय सावंत,जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, समाधान पाटील, सुनील पाटील, आ. किशोरअप्पा पाटील,आ. चंद्रकांत सोनवणे, माजी आ. चिमणराव पाटील, कैलास पाटील, कुणाल दराडे, शिवराज पाटील, गजानन कीर्तिकर, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपाध्यक्ष शरद पाटे, मुकुंद बिल्दीकर, उद्धव मराठे, पदमसिंह पाटील, दिपकसिहं राजपूत, रावसाहेब पाटील, अॅड दिनकर देवरे, गणेश पाटील, शरद पाटील, रवी केशवानी, सुमित पाटील, सुनिता पाटील, अतुल पाटील, प्रताप पाटील, रामकृष्ण पाटील, गणेश परदेशी, राजेंद्र पाटील, अरुण पाटील, सुधाकर वाघ, संजय पाटील, पप्पू राजपूत, किशोर बारावकर, आदी उपस्थित होते संपर्क प्रमुख सुनील सावंत यांनी आदित्य ठाकरे यांचा सर्जा राजाची बैल गाडी व झाडाचे रोप देऊन सन्मान केला. याप्रसंगी संजय राऊत यांनी भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे असतील येत्या एक महिन्यात सारा महाराष्ट्र भगवामय झालेला असेल आदित्य ठाकरे यांच्या नवा महाराष्ट्र घडविण्याच्या या निर्धाराला साथ व आशीर्वाद द्या असे आवाहन केले. आ. किशोरअप्पा पाटील यांनी जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात पाचोरा येथूनच का ? हे स्पष्ट करताना पाचोर्‍याची भूमी सेनेचा बालेकिल्ला असून बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी येथे येऊन जनतेला संबोधित केले आहे. ठाकरे घराण्याची चौथी पिढी आदित्य ठाकरे च्या रूपाने येथे यावी व इथून नवे अभियान सुरू करावे हा उद्देश यामागे असल्याचे स्पष्ट केले उपस्थित ज्येष्ठ सैनिकांनी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील असा दिलेला आशीर्वादही त्यांनी वाचून दाखवला.
सभा संपल्यानंतर आदित्य ठाकरे हे व्यासपीठावरून उतरून सरळ व्यासपीठासमोरील उपस्थितांमध्ये गेले व त्यांनी अनेकांचा चरण स्पर्श केला. तरुणांशी हस्तांदोलन केले व आशीर्वाद मिळवला त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी व पोलीस यंत्रणा यांची चांगलीच तारांबळ उडाली.
या कार्यक्रमानिमित्ताने संपूर्ण शहराला भगवे रूप प्राप्त झाले होते. सभेच्या परिसरात देखील बॅनर झेंडे फलक लक्ष वेधून घेत होते. आ. किशोरअप्पा पाटील यांनी प्रास्ताविक केले नाना वाघ यांनी सूत्रसंचालन केले गणेश पाटील यांनी आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोऱ्यातील आदित्य ठाकरेंची सभा रेकॉर्डब्रेक होणार !

Next Post

आज पाणी वाचवले तरच पुढच्या पिढीला मिळेल : डॉ. दीपक पाटील

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
आज पाणी वाचवले तरच पुढच्या  पिढीला मिळेल : डॉ. दीपक पाटील

आज पाणी वाचवले तरच पुढच्या पिढीला मिळेल : डॉ. दीपक पाटील

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us