Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तापी नदीत प्रेमी युगुलाने घेतली उडी ; तरुणाचा मृत्यू तर तरुणी बचावली

Editorial Team by Editorial Team
October 16, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
तापी नदीत प्रेमी युगुलाने घेतली उडी ; तरुणाचा मृत्यू तर तरुणी बचावली
ADVERTISEMENT

Spread the love

शिरपूर : तालुक्यातील सावळदे येथील पुलावरुन तापी नदीत आज शनिवारी सकाळी प्रेमी युगुलाने उडी मारली. यात युवकाचा मृत्यू झाला तर युवतीला पट्टीच्या पोहणार्‍यांनी तातडीने बाहेर काढल्याने ती बचावली. अमोल किशोर कोतकर (वय 31, रा.वारूळ-पाष्टे ता.शिंदखेडा) असे मृत युवकाचे नाव असून प्रेमप्रकरण उघड झाल्यानंतर सोबत राहणे शक्य होणार नसल्याने हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी आढळले.

याबाबत असे की, अमोल कोतकर याचे शिरपूर फाट्यावर आशापुरी स्पेअर पार्टस् हे दुकान आहे. त्याचे येवला येथील तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्या तरुणीचे माहेर मालेगाव (जि.नाशिक) येथील असून सासर नाशिक येथील आहे. दोघेही नातलग असून काही महिन्यांपूर्वी त्यांचे प्रेमसंबंध जुळले. प्रेम फुलत गेल्याने त्याची कुणकूण तरुणीच्या सासरच्या लोकांना लागली. त्यांनी चौकशी करुन अमोल कोतकरशी तिचे संबंध असल्याचे हुडकून काढले.

15 ऑक्टोबरला तरुणीला घेवून सासरचे कुटूंब धुळे येथे पोहचले. अमोल कोतकरलाही बोलावण्यात आले. तुमचे प्रेमसंबंध असतील तर घटस्फोट देऊन अमोलसोबत जा असे सासरच्या लोकांनी त्या तरुणीला सांगितले. मात्र तिच्या आईने घटस्फोटाला नकार दिला. अखेर दोन्ही बाजूंचे लोक नरडाणा येथे गेले. तेथे अमोलच्या कुटुंबाशी त्यांची शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर तरुणीला घेऊन अमोल शिरपूरला निघून गेला.

शनिवारी सकाळी अमोल व तरुणी आत्महत्या करण्याच्या हेतूने सावळदे येथे पोहचले. तेथील पुलावर पोहचल्यावर त्यांनी बाहेरगावी जाऊन एकत्र राहू असा विचार केला. तेथून दोघेही परत शिरपूरला आले. मात्र दोघेही विवाहित असल्यामुळे पुढील आयुष्यात अनेक अडचणी उभ्या राहतील, त्यापेक्षा मरण बरे अशा विचाराने ते पुन्हा सावळदे येथे पोहचले. सकाळी नऊला दोघांनी हातात हात घेऊन पुलावरुन उडी टाकली. त्याचवेळी नदीपात्रात सावळदे येथील पट्टीचे पोहणारे 15 ऑक्टोबरला बुडालेल्या युवकाचा शोध घेत होते. त्यांच्यापासून काही अंतरावरच दोघे पाण्यात पडले. लागलीच धाव घेवून दर्शनाला जिवंत बाहेर काढण्यात संबंधितांना यश आले.

मात्र अमोल उडी टाकल्यानंतर थेट तळाशी गेल्याने त्याचा शोध लागू शकला नाही. तीन तासानंतर त्याचा मृतदेह हाती लागला. डीवायएसपी अनिल माने, निरीक्षक रवींद्र देशमुख, थाळनेरचे सहायक निरीक्षक उमेश बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली. सावळदे येथील सरपंच सचिन राजपूत यांनी मदतकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेत 10 वी, 12 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी! 1600 हून अधिक जागा रिक्त

Next Post

केंद्राकडून सीबीआय-ईडी-एनसीबीचा गैरवापर ; शरद पवारांची घणाघात

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
केंद्राकडून सीबीआय-ईडी-एनसीबीचा गैरवापर ; शरद पवारांची घणाघात

केंद्राकडून सीबीआय-ईडी-एनसीबीचा गैरवापर ; शरद पवारांची घणाघात

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us