Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जुन्नर येथे ‘या’ तारखेपासून द्राक्ष महोत्सव रंगणार

najarkaid by najarkaid
February 17, 2022
in राज्य
0
जुन्नर येथे ‘या’ तारखेपासून द्राक्ष महोत्सव रंगणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, –  : शिवजयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत ऐतिहासिक जुन्नर शहरात 19 ते 21 फेब्रुवारी 2022 या तीन दिवसांत द्राक्ष महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांच्या विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार असून विविध सांस्कृतिक आणि खाद्य महोत्सव, कृषी पर्यटन हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे.

या ऐतिहासिक शहरात द्राक्ष महोत्सवाचे हे पाचवे वर्ष आहे. वर्षागणिक या महोत्सवाची लोकप्रियता वाढत असून शेकडोंच्या संख्येने पर्यटक महोत्सवाला भेट देतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव होत असल्यामुळे याद्वारे पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, तसेच कला कुसर करणारे कारागीर, बचत गट, लघु उद्योजकांच्या व्यवसायाला हातभार लागेल.

या महोत्सवाचे उद्घाटन 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होईल. या महोत्सवात विविध जातींची द्राक्षे, द्राक्षांपासून बनवलेले विविध खाद्यपदार्थांचा तसेच बहारदार द्राक्षांच्या बागांमध्ये फिरण्याचा अनुभव घेता येणार आहे. या महोत्सवात पर्यटकांना हेरीटेज वॉक अंतर्गत जुन्नर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा पाहण्याची संधी मिळणार असून, या वॉकमध्ये पंचलिंग मंदिर, शिवसृष्टी, मुघलकालीन खापरी पाईपलाईन, सौदागर घुमट, हबशी महाल इत्यादी ठिकाणांना भेट देण्यात येईल. रात्री पर्यटकांसाठी कॅम्प फायरची व्यवस्था केली जाईल, जेथे पर्यटक आपल्या मित्र परिवारासोबत मजेशीर खेळ खेळून चांगला वेळ घालवू शकतील. 20 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या प्रसिद्ध शिवनेरी किल्ल्याची सफर आयोजित केली जाणार आहे. जुन्नरमधील देवराईमध्ये किंवा वनपरिक्षेत्रांत निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमींना पक्षी निरीक्षण उपक्रमात सहभागी होता येईल. त्यानंतर कुकडेश्वर मंदिर, नाणेघाट इत्यादी ठिकाणी भेट दिली जाईल. शेवटच्या दिवशी म्हणजेच 21 फेब्रुवारी रोजी हडसर किल्ला किंवा पर्वत गडावर ट्रेकिंगचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर ओझर गावातील गणपती, गीब्सन स्मारक, अंबा अंबिका लेणी समुह, ताम्हाणे संग्रहालय, लेण्याद्री गणपती आदींचे दर्शन घेता येईल. तसेच स्थानिक जुन्नरच्या आठवडी बाजारांमध्ये जाऊन तेथील लोक पदार्थ-वस्तू पाहता आणि खरेदी करता येतील.

येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे, कारण ते इथे येऊन शेतातील ताज्या द्राक्षांचा आस्वाद घेऊ शकतात आणि महत्वाचं म्हणजे वाईन कशी बनते याची प्रक्रिया डोळ्यादेखत पाहून ते वाईन खरेदी करू शकतात. पर्यटक आमच्याकडे ब्लॅक करंट, मनुके आणि द्राक्षांचा ताजा रस यांचा मधुर आस्वाद घेऊ शकतात. त्याच पद्धतीने वेलीला लगडलेली द्राक्ष काढून ती विकत घेऊ शकतात, त्यामुळे खऱ्या अर्थाने ऑरगॅनिक फळ आपल्या आरोग्याच्या करंडीत समाविष्ट करू शकतात, असे पुणे विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून द्राक्षाची लागवड आणि शेतीसाठी खूप चांगला पाठिंबा दर्शविला जाणार आहे. पर्यटक, शेतकरी आणि व्यावसायिक समूदाय यांनी एकत्र येऊन द्राक्षाच्या बाजारपेठेसाठी आर्थिकदृष्ट्या उचललेले हे अत्यंत महत्वाचे पाऊल असणार आहे. ज्यांना हा अमूल्य अनुभव घ्यायचा आहे, त्यांनी https://bit.ly/3tUCoQL या गूगल लिंक वर जाऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विविध खेळांचे उदघाटन

Next Post

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात बदल होणार, कोण असतील नवे चेहरे ; कुणाला मिळणार डच्चू ?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात बदल होणार, कोण असतील नवे चेहरे ; कुणाला मिळणार डच्चू ?

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात बदल होणार, कोण असतील नवे चेहरे ; कुणाला मिळणार डच्चू ?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us