Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जावयाला मुलगा मानून लावला दुसरा विवाह!

मूळच्या जळगाव येथील ॲड. संजय राणे व कुटुंबाचा आदर्शवत निर्णय!!

najarkaid by najarkaid
December 14, 2021
in जळगाव
0
जावयाला मुलगा मानून  लावला दुसरा विवाह!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : मागील वर्षी कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे अनेकांना नातेवाईक व आप्तेष्ट गमवावे लागलेत. बहुतांश जणांचे संसार अर्ध्यावर मोडले. या आघातातून काही कुटुंबे सावरू लागली आहेत. नव्याने संसाराची उभारणी होत आहे. अशा फेरजुळणीत एक आदर्शवत गंधर्व विवाहविधी गुरूवारी, दि.९ ला वरणगाव (ता. भुसावळ) येथे पार पडला.कोरोना संसर्गामुळे विवाहित कन्येला गमावणाऱ्या पालकांनी जावई व दोन नातींचे कुटुंब पुन्हा फुलविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

जळगाव येथील सुप्रसिद्ध विधीज्ञ व भोरगांव लेवा पंचायतीचे कुलसचीव ॲड.संजय राणे यांचे थोरले बंधू मिलिंद मनोहर राणे (रा. अहमदाबाद) यांची कन्या सौ. कोमल हिचा विवाह अहमदाबाद येथील सुजीत दिलीप महाजन यांच्याशी झाला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गामुळे सौ. कोमल हिचे दि. ३ मे २०२१ ला निधन झाले. स्व. सौ. कोमल व सुजीत यांना उर्वि व चार्वी अशा दोन मुली आहेत. त्या दोघी लहान आहेत. स्व. सौ. कोमल ही सातवीत असताना पासून तिचे संपुर्ण शिक्षण हे आजोबा एम. डी. राणे, आजी स्व. पुष्पलता व काका ॲड. संजय व किरण राणे यांच्याकडे जळगावला झाले. तिचे लग्नही त्यांच्या पुढाकाराने सुजीत यांच्याशी जुळले होते. त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. मात्र कोरोनाच्या आपत्तीने संसाराला दृष्ट लागली.

स्व. सौ. कोमलच्या अकाली निधानानंतर जावाई आणि नातींचे कुटुंब अधुरे झाले. सुजीत यांचा संसार पुन्हा फुलविण्यासाठी ॲड. संजय राणे यांनी कुटुंबात पुढाकार घेतला. ॲड. संजय राणे हे भोर पंचायतीचे कुलसचिव म्हणून कार्यरत आहेत. ते पंचायतीच्या सर्व कार्यात सहभागी होतात. अनेकांचे दुरावलेले वा घटस्फोटीत संसार ते पुन्हा जुळवतात. ॲड. संजय राणे यांनी सुजीत यांचा दुसरा विवाह करण्याचे सूचविले. जेष्ठ बंधु मिलिंद व उद्योजक किरण राणे व सुजीत यांचे वडील दिलीप महाजन व आजोबा एम. डी. राणे यांनीही हा विचार उचलून धरला. सुजीत हे सुद्धा तयार झाले.

ॲड. संजय राणे व कुटुंबियांनी सुजीत यांना मुलगा मानून त्यांचा दुसरा विवाह जुळवायला प्रयत्न सुरू केले. परिचितांमधून नशिराबाद (ता. जळगाव) येथील विनोद रोटे यांची कन्या लिनाचे स्थळ समोर आले. लिना घटस्फोटीता आहे. ती सुद्धा दुसऱ्या विवाहास तयार होती. अखेर राणे-महाजन कुटुंबियांच्या संमतीने रितसर विवाह जुळणी झाली. सुजीत व लिनाचा गंधर्व विवाह गुरूवार, दि. ९ रोजी पार पडला. या विवाहाकडे आदर्शवत आणि अनुकरणीय पाऊल म्हणून पाहता येते. जुन्या परंपरा मोडून कुटुंब पुन्हा फुलविण्याचा राणे,महाजन व रोटे कुटुंबाचा हा प्रयत्न समाज परिवर्तनाचा नवा माईलस्टोन रोवणारा असून समाजासमोर आदर्श घडविणारा आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून सातगावच्या शेतकऱ्याने संपविले जीवन

Next Post

चाळीसगाव नजीक भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
चाळीसगाव नजीक भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू

चाळीसगाव नजीक भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us