Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांना वेग ; आतापर्यंत ‘इतके’ टक्के झाल्या पेरण्या

Editorial Team by Editorial Team
July 14, 2023
in जळगाव
0
केंद्राच्या ‘या’ 5 योजना शेतकर्‍यांसाठी आहेत मोठ्या कामाच्या ; जाणून घ्या कोणत्या आहेत?
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव । जळगाव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्यांना आता गती आली आहे. जिल्ह्यात आज‌ अखेरपर्यंत ५५४६७५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरण्याचे हे प्रमाण एकूण सरासरी क्षेत्राच्या ७२ टक्के इतके झाले आहे. यंदाच्या खरिपात सर्वाधिक पेरण्या जामनेर तालुक्यात ६८०१९ हेक्टर क्षेत्रावर झाल्या आहेत. पेरण्याचे हे प्रमाण एकूण सरासरी क्षेत्राच्या ६८ टक्के इतके आहे. खान्देशचे पीक म्हणून ओळख असणाऱ्या कापसाच्या ४४५७४७ हेक्टर क्षेत्रावर सर्वाधिक पेरण्या झाल्या आहेत.

जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र ७ लाख ६९ हजार ६०१ हेक्टर इतके आहे. यंदाच्या खरीप हंगामात जून महिना हा कोरडा गेला आहे. कापूस लागवडीस उशीर झाला मात्र जुलैपासून महिन्यांपासून चांगला पाऊस पडण्यास सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळेच खरीप पेरण्यांना गती आली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात खरीप ज्वारी, बाजरी, मका, इतर तृणधान्य, तूर, मूग, उडीद, इतर कडधान्य, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन , इतर गळीतधान्य, कापूस आदी प्रमुख पिके घेतली जातात. पीकनिहाय पेरणी झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये (कंसात एकूण सर्वसाधारण क्षेत्राशी टक्केवारी)- खरीप ज्वारी – १३ हजार ९९ (२९ टक्के), बाजरी – ५ हजार ४७० (३५ टक्के), मका – ५१ हजार १५६ (६० टक्के), इतर तृणधान्य – ४४५ (२१ टक्के), तूर- ५ हजार १५५ (३१ टक्के), मूग – ८ हजार ६६५ (३१ टक्के), उडीद- ७ हजार १२३ (२७ टक्के), इतर कडधान्य – १८२ (१७ टक्के), भुईमूग — ४११ (१४ टक्के), तीळ-१५२ (८ टक्के), सूर्यफूल -१४ (२३ टक्के), सोयाबीन- ९ हजार ५६ (३१ टक्के) कापूस- ४ लाख ४५ हजार ७४७ (८९ टक्के) आहे.

हे पण वाचा….

धक्कादायक : नवविवाहित तरुणीने विहिरीत उडी मारुन संपविले जीवस, तीन महिण्यापुर्वीचं प्रेम विवाह झाला होता

दरीत ओढत नेत महिलेवर आठ जणांनी केला आळीपाळीने बलात्कार : बुलढाण्यातील खळबळजनक घटना

या सरकारचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय वाढले, आता इतक्या वर्षात निवृत्ती होणार…

खरिपाचे पेरणी झालेले तालुकानिहाय हेक्टर क्षेत्र (कंसात एकूण सर्वसाधारण क्षेत्राशी टक्केवारी)- जळगाव – २५०२६ (४४ टक्के), भुसावळ – २२२१४ (७७ टक्के), बोदवड – ३२९४९ (९९ टक्के), यावल-३३७२९ (७८ टक्के), रावेर- १६५७० (५६ टक्के), मुक्ताईनगर – १४५६६ (४९ टक्के), अमळनेर -५००८९ (७२ टक्के), चोपडा- ५४१४६ (८५ टक्के), एरंडोल -२९९९० (७६ टक्के), धरणगाव – १९२६७ (४३ टक्के), पारोळा- ४२४५९ (८२ टक्के), चाळीसगाव – ६२३७० (७२ टक्के), जामनेर -६८०१९ (६८ टक्के), पाचोरा -५३२७३ (९२ टक्के), भडगाव -३००९७ (८६ टक्के) पेरण्या झाल्या आहेत.

जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ साठी ३‎ लाख ५ हजार १४० मेट्रिक टन‎ रासायनिक खतांचे आवंटन‎ मंजुर करण्यात आले आहे. १ लाख ५७ हजार ९२ मेट्रिक टन‎ खत साठा उपलब्ध आहे. १८०० टन युरीया, २५५ टन डीएपी खतांचा बपर स्टॉक उपलब्ध आहे. खरीप पिके वाढीच्या अवस्थतेत आहेत. खतांची टंचाई नसून पुरेशा साठा विक्रीकरिता उपलब्ध आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली आहे.

शासनाने २०२३-२४ पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात शेतकरी हिस्स्याचा विमा हप्ता रक्कम शासना मार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १ रूपया भरून https://pmfby.gov.in वर स्वतः किंवा बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्रामार्फत ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करावा. असे आवाहन कृषी उपसंचालक चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Spread the love
Tags: पेरण्या
ADVERTISEMENT
Previous Post

या सरकारचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय वाढले, आता इतक्या वर्षात निवृत्ती होणार…

Next Post

हतनूर धरणाचे २४ दरवाजे दीड मीटरने खुले; तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Related Posts

Palaskheda Beer Shop Raid: भडगाव पोलिसांची धाड, 28 हजारांची बेकायदेशीर दारू जप्त

Palaskheda Beer Shop Raid: भडगाव पोलिसांची धाड, 28 हजारांची बेकायदेशीर दारू जप्त

July 30, 2025
Anubhuti School Nashik Award:  प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

Anubhuti School Nashik Award: प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

July 29, 2025
जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन - अतुल जैन यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

July 29, 2025
फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

July 29, 2025
Accident jalgaon news: देव दर्शनासाठी जाणाऱ्या दोन मित्रांचा दुचाकी-जीप अपघातात मृत्यू

Accident jalgaon news: देव दर्शनासाठी जाणाऱ्या दोन मित्रांचा दुचाकी-जीप अपघातात मृत्यू

July 29, 2025
Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

July 28, 2025
Next Post
तापी नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हतनूर धरणाचे २४ दरवाजे दीड मीटरने खुले; तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ताज्या बातम्या

Trump New Visa Policy 2025: ट्रंप सरकारच्या नव्या व्हिसा धोरण, नवीन नियम लागू

Trump New Visa Policy 2025: ट्रंप सरकारच्या नव्या व्हिसा धोरण, नवीन नियम लागू

July 30, 2025
PM Crop Insurance Kharif 2025: प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण!

PM Crop Insurance Kharif 2025: प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण!

July 30, 2025
Child Kidnapping in Pune: चिमुरडीचे अपहरण, भीक मागायला लावणारी टोळीचा पर्दाफाश!

Child Kidnapping in Pune: चिमुरडीचे अपहरण, भीक मागायला लावणारी टोळीचा पर्दाफाश!

July 30, 2025
Palaskheda Beer Shop Raid: भडगाव पोलिसांची धाड, 28 हजारांची बेकायदेशीर दारू जप्त

Palaskheda Beer Shop Raid: भडगाव पोलिसांची धाड, 28 हजारांची बेकायदेशीर दारू जप्त

July 30, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

today Rashi bhavishya: आजचे राशीभविष्य 30 जुलै 2025 – जाणून घ्या तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस

July 30, 2025
Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील 'तो' प्लॅट तीन वर्षासाठी सील!

Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील ‘तो’ प्लॅट तीन वर्षासाठी सील!

July 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us