पाचोरा : तीन महिण्यापुर्वी प्रेम विवाह केलेल्या तरुणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागातील गोविंद नगरमध्ये घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पती पत्नीत किरकोळ वाद झाला व आजी सासू, सासू चुलत सासू त्रास देत असल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवासी असलेला राहुल चव्हाण याचा प्रेम विवाह लिहा तांडा ता. जामनेर येथील काजल राठोड हिच्याशी तीन महिन्यांपूर्वी झाला होता.
मात्र,कुऱ्हाड येथे नांदवयासाठी आल्यानंतर काजल हिस सुग्राबाई बद्री चव्हाण (आजी सासु), मुक्ताबाई रामधन चव्हाण (सासु), पार्वतीबाई चव्हाण (चुलत सासु) ह्या सतत चोटून बोलत असल्याने त्यांच्यात वाद होत असे, यामुळे राहुल व काजल हे १० जुलै रोजी सोमवारी पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागातील गोविंद नगरमध्ये राहण्यासाठी आले होते.
राहुल व काजल यांच्यात बुधवारी दुपारी किरकोळ वाद झाला त्यानंतर काजल ही कुणास काही एक न सांगता घरातून निघून गेली.
दरम्यानं काजलने आज राहत असलेल्या घरा शेजारील विहिरीत उडी घेऊनं आत्महत्या केली.
काजल हिच्या आईने पाचोरा येथे तिचा मृतदेह पाहिल्यावर एकच आक्रोश केला. काजलच्या नातेवाईकांनी तिचा छळ झाल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप केला असून यावरून काजलच्या सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजया विसावे ह्या करीत आहेत.

