बुलढाणा : महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना घडलीत. बुलढाणा येथील राजूर घाटात एका 35 वर्षीय महिलेला चाकूचा धाक दाखवून तब्बल आठ जणांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तसेच तिच्याकडील 45 हजार रुपयेही लुटून आरोपी फरार झाले आहेत.या घटनेमुळे बुलढाण्यात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
पीडित महिला आणि पुरुष दोघेही खडकी गावी जात होते. त्यावेळी राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळ सेल्फी काढण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी आठजणांचं टोळकं आलं. त्यांनी या दोघांना प्रचंड मारहाण केली. त्यानंतर या महिलेला दरीत ओढत नेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
महिलेसोबत असलेल्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम लुटून घेतली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांत आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

