Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गेल्या पाच वर्षात मतदार संघाचा चौफेर विकास केला -आ.किशोरअप्पा पाटील

najarkaid by najarkaid
October 7, 2019
in जळगाव
0
गेल्या पाच वर्षात मतदार संघाचा चौफेर विकास केला -आ.किशोरअप्पा पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव प्रतिनिधी : पाच वर्ष मिळालेल्या संधीचे आपण सोने केले असुन तालुक्याचा चौफेर विकास साधला आहे. भडगाव तालुक्यात 132 सबस्टेशन, एमआयडीसी, रस्ते, गिरणा नदिवर दोन ठीकाणी पुल, शहरासाठी गिरणा धरणातुन पाणी आरक्षण आदि महत्वाच्या प्रश्न सोडविले आले. तर आगामी काळात शहरासाठी 65 कोटी ची पाणीपुरवठा योजना व गिरणा नदिवरील बलून बंधारे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. ते ही लवकरच पुर्णत्वास येतील असे प्रतिपादन शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार आमदार कीशोर पाटील यांनी केले.

प्रचारादरम्यान ते भडगाव येथील नारायणभाऊ मंगल कार्यालयात आयोजित व्यापारी मेळाव्यात बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रकाश भंडारी होते.
व्यासपीठावर माजी नगरध्यक्ष राजेंद्र पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष प्रतापराव पाटील, नगरध्यक्ष अतुल पाटील, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य विकास पाटील, व्यापारी छोटुभाऊ जैन, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, पंचायत समीतीचे सभापती रामकृष्ण पाटील, मास्टरलाईनचे समीर जैन, सहसंपर्कप्रमुख संजय पाटील, दिलीप मराठे, प्रकाश भंडारी, मेडीकल असोसिएशन चे सुरेश भंडारी, उपनगरध्यक्ष डाॅ. वसिम मिर्झा, देविदास पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डाॅ. विलास पाटील , सहकार सेलचे युवराज पाटील, माजी नगरध्यक्ष शशिकांत येवले, सुनील देशमुख, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाप्रमुख इमरान अली सय्यद, स्विकृत नगरसेवक डाॅ. प्रमोद पाटील, पवन अग्रवाल, बात्सरचे संजय पाटील, वाड्याचे जालिंदर चित्ते, माजी नगरसेवक शंकर मारवाडी, जगन भोई, सौरभ पाटील , भाउसाहेब भोसले, आबा चौधरी, युवासेनेचे जिल्हासरचिटणीस लखीचंद पाटील, प्रदिप महाजन,
सुनील महाजन, शिवदास महाजन, युवासेनेचे निलेश पाटील आदि उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, तालुक्यातील रस्त्याचा प्रश्न पुर्णपणे निकाली काढण्यात आपल्याला यश आले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमाने दुर्लक्षित रस्त्याचे काम मार्गी लावले. कजगावला 21 कोटीचा उड्डाण पुलाचे कामं मंजुर केले. पाढंरद ते निंभोरा दरम्यान गिरणा नदिवर पूलाचा मार्गी लावला. तर भडगाव ते जुने वाक रस्त्यावरही गिरणा नदिवर नाबार्ड कडुन पुलाला मंजुरी मिळाली आहे. गुढ ते नावरे व जुने मटन मार्केट ते भडगाव पेठ भागाला जोडणार गिरणेवरील पुल मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय भडगाव तालुक्यात स्वातंत्र्यानंतरही 132 केव्ही वीज सबस्टेशन नव्हते. मी विधानभवनात उपोषणाला बसवून हा प्रश्न मार्गी लावला. त्याबरोबरच वडजी, लोणपिराचे, वडधे येथे 33/11सबस्टेशनचे उभारण्यात यश आल्याचे मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगीतले.
ते पुढे म्हणाले की, भडगाव तालुक्यात एमआयडीसी ला ही मंजुरी मिळविण्यात यश आले. त्यामुळे येथे आगामी काळात मोठे उद्योग उभे राहून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. भडगाव ग्रामीण रूग्नालयाला उपजिल्हा रूग्नालालयाचा दर्जा मिळविता आले. एवढेच नाही तर त्यासाठी निधीही मंजुर झाला आहे. पर्यटन विकास योजनेंतर्गत भडगाव शहरात तिनं कोटींचे गिरणा काठावर कामं सुरू आहे. मैत्रियेच्या ठेवीदारांठी आपण लढा दिला आहे. त्यांना पुढच्या टप्प्यात ठेवी परत मिळतील अशा स्टेज आली आहे. आता आगामी काळात शेतरस्ते करण्यावर आपला भर असणार आहे. याशिवाय गिरणा नदिवर बलून बंधारे अंतिम टप्प्यात आहेत. त्यांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यावर आपला भर असेल. शहरासाठी 65 कोटीची पाणीपुरवठा योजनेची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे, तिला मंजुरी मिळवून शहराला 24 तास पाणी देण्याच्यादृष्टीने आपले प्रयत्न असणार आहेत. तर भडगावला प्रस्तावित आरटीओ कार्यालय करण्यासाठी कंबर कसु असे त्यांनी आपल्या भाषणातुन सांगीतले. दरम्यान यावेळी गणेश परदेशी, समीर जैन, सौरभ पाटील , महेश मोरणकर, सुरेश भंडारी, दिलीप मराठे या व्यापार्यानी मनोगत व्यक्त करत कीशोर पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. मेळाव्याला व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव ग्रामीण मतदार संघात लकी टेलर यांचा झंझावाती प्रचार

Next Post

पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशनचा आमदार किशोर आप्पा पाटील यांना जाहीर पाठींबा !

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशनचा आमदार किशोर आप्पा पाटील यांना जाहीर पाठींबा !

पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशनचा आमदार किशोर आप्पा पाटील यांना जाहीर पाठींबा !

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us