Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्यातून जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे शिरसोली रोडवर स्वच्छता मोहीम

८ टन कचरा संकलित - जकात नाक्याचा श्वास मोकळा

najarkaid by najarkaid
March 24, 2023
in जळगाव
0
गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्यातून जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे शिरसोली रोडवर स्वच्छता मोहीम
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. २४ (प्रतिनिधी): शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मोहिमेत सहभागी होत महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थी स्वयंसेवकांनी आज शिरसोली रोड परिसर, कृष्णा लॉंन परिसर, गणपती मंदिर परिसर व जकात नाक्याचा श्वास मोकळा केला. रस्त्याच्या शेजारी साचलेला प्लास्टिक, जैविक कचरा असा सुमारे ८ टन कचरा संकलित केला. त्यामुळे या परिसराचे रूप पालटले. चार तासांच्या या मोहिमेत १०० हून अधिक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी होत जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यस्थापन महाविद्यालयाने जळगाव शहरातील विविध अस्वच्छ भाग स्वच्छ करण्याचा कृतिशील उपक्रम राबवण्याचा वज्रनिर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर जी. एच. रायसोनी महाविद्यालयाने शिरसोली रोड परिसर स्वच्छ करण्याचा निर्धार केला.

सकाळी दहा वाजता रायसोनी महाविद्यालयापासून विद्यार्थ्यांनी ‘चला जळगाव शहर, स्वच्छ करूया’ ही जनजागृती फेरी काढली. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्याहस्ते या फेरीचा प्रारंभ झाला. या अनुषंगाने शिरसोली रोडवर हि फेरी निघाली. जळगाव शहर स्वच्छतेचे आवाहन करत ‘चला जळगाव शहर, स्वच्छ करूया’ असा संदेश जनजागृती फेरीतून देण्यात आला. त्यानंतर शिरसोली रोड परिसर स्वच्छतेला सुरुवात झाली. येथील परिसरात कित्येक दिवसांपासून कचरा साचल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत होती.

पुढील काळात स्वच्छतेचे महत्त्व जपत शिरसोली रोडसह जळगाव शहरातील विविध भागाच्या संवर्धनाची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. वसिम पटेल, प्रा. राहुल त्रिवेदी व गांधी रिसर्च फाउंडेशनचे मदन लाठी, हेमंत बेलसरे हे या उपक्रमावेळी उपस्थित होते. उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी यांनी कौतुक केले व भावी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात.

आयुक्त्तांची तत्परता…

विद्यार्थी, स्वयंसेवकांच्या स्वच्छतेनंतर या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या उपक्रमाच्या समन्वयकांनी जळगाव शहराच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना संपर्क साधला असता, डॉ. विद्या गायकवाड यांनी तत्काळ तिथे कचरा गाडीच्या सहाय्याने या कचऱ्याची विल्हेवाट लावली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबई महानगरपालिकेअंतगर्त 12वी पाससाठी मोठी भरती, असा करा अर्ज?

Next Post

लाच भोवली ; सहाय्यक फौजदारसह दोघे एसीबीच्या जाळ्यात

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात

लाच भोवली ; सहाय्यक फौजदारसह दोघे एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us