Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एमआयएम राज्यात ७४ जागांवर स्वबळावर लढणार-जलिल

najarkaid by najarkaid
September 10, 2019
in राजकारण
0
एमआयएम राज्यात ७४ जागांवर स्वबळावर लढणार-जलिल
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद- वंचित आघाडीसोबतच्या आघाडीत बिघाडी झाल्यानंतर एमआयएम आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलिल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एमआयएमने ७४ जागांवर लक्ष केंद्रीत केले असून उमेदवारांच्या मुलाखती सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

औरंगाबादमध्ये आज मालेगाव, बडगाव, भोकर, नांदेड मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्याची माहिती जलिल यांनी दिली. टप्प्याटप्याने इतर मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता कोणासोबत युती नसल्यामुळे किती जागांवर उमेदवार लढवायचे यावर बंधन नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सध्या एमआयएम ७४ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. एमआयएम सोबत दलित मराठा आणि ओबीसी समाज असल्याचा दावा त्यांनी केला. दलित समाज किंवा अन्य कोणत्या समाजावर एका पक्षाचे वर्चस्व आहे. हे कोणी समजू नये असेही जलिल यांनी म्हटले. वंचित बहुजन आघाडी सोबत एमआयएमची आघाडी झालेली नसल्याने अनेक पक्षातील नेत्यांनी एमआयएमशी उमेदवारीशी संपर्क करीत असल्याची माहिती खासदार जलील यांनी दिली.
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांनी लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. त्यावेळी या आघाडीला लक्षणीय मतदान झाले होते. तर, इम्तियाज जलिल निवडूनदेखील आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून एमआयएम वंचित बहुजन आघाडीसोबत लढणार नसल्याचे जलिल यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आज एमआयएमने राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केले.
मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न
वंचित बहुजन आघाडीसोबत काडीमोड झाल्यानंतर आपल्याला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे खासदार इम्तियाज जलिल यांनी म्हटले. राज्यातील निवडणुकीबाबत पक्ष अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा करुनच निर्णय घेण्यात आला होता. वंचित आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी एमआयएमसोबत चर्चा सुरू असल्याचे म्हटले. मात्र, एमआयएमच्या कोणत्या नेत्यासोबत चर्चा सुरू आहे हे त्यांनी सांगावे असे आवाहनही जलिल यांनी दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नूतन मराठा हाणामारी प्रकरणातील विजय पाटील यांना अटक

Next Post

पाचोरा भडगाव मतदारसंघात आ.किशोर पाटील यांच्याहस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
पाचोरा भडगाव मतदारसंघात आ.किशोर पाटील यांच्याहस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

पाचोरा भडगाव मतदारसंघात आ.किशोर पाटील यांच्याहस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us