Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेऊ शकतात का ? शिवसेनेची घटना काय सांगते ? ;राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य कोण आहेत ?

najarkaid by najarkaid
June 25, 2022
in राजकारण
0
एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेऊ शकतात का ? शिवसेनेची घटना काय सांगते ? ;राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य कोण आहेत ?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – राज्यात राजकीय भूकंप करणारे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांना सोबत घेत बंड पुकारले असतांना एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेऊ शकतात का?शिवसेनेची घटना काय सांगते?;राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य कोण आहेत? शिवसेनाप्रमुख’ पदाला काय आहेत अधिकार? असे अनेक प्रश्न चर्चेला येत आहेत.या सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे नवा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्याकडे आमदारांचा मोठा गट गेल्यामुळे दोन तृतीयांश नियमाप्रमाणे सर्वांत मोठा गट कुणाचा तसेच एकनाथ शिंदे थेट शिवसेनेवर हक्क सांगू शकतात का?, असा प्रश्न उपस्थित झाल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.खरी शिवसेना शिंदेची की उद्धव ठाकरेंची अशा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.दरम्यान प्रविण बिराजदार यांनी थेट ‘शिवसेना’ पक्षाची घटना ट्विट करून बरंच स्पष्टीकरण दिलं आहे.

पक्षाने निवडणूक आयोगाला दिलेली घटना/संविधान हे अधिकृत असते.आता शिवसेनेच्या घटनेत “शिवसेना प्रमुख” हे पद सर्वोच्च आहे आणि फक्त शिवसेना प्रमूख यांनाच कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे (राष्ट्रिय कार्यकारणीच्या संगनमताने).
आता शिंदे त्या पदावर बसू शकतात का ?नाही.शिवसेना प्रमुख हे प्रतिनिधी सभेचे सदस्य निवडून देतात.
ज्यात फक्त आमदार , खासदार नसतात तर जिल्हा प्रमुख ते जिल्हा संपर्क प्रमुख ते मुंबईतील विभाग प्रमूख ई. असतात.२०१८ मध्ये एकूण २८२ जण होते ज्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमूख पदी निवडून दिले होते.

महत्वाची बाब..म्हणजे ज्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या संगनमताने शिवसेना प्रमुख काम करतात , त्या राष्ट्रीय कार्यकारणीतील १४ सदस्य हे पण प्रतिनिधी सभा निवडून देतात आणि जास्तीत जास्त ५ जणांची नियुक्ती ही शिवसेना प्रमुख करतात.तर आता ह्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य कोण आहेत ? हे जाणून घेऊया…

कोण आहेत राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य ?

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांना शिवसेनेत पक्षनेते’ म्हणून ओळखले जाते. २०१८ मध्ये प्रतिनिधी सभेने ९ जणांना पक्षनेते म्हणून निवडून दिले. विशेष बाब म्हणजे यात एकनाथ शिंदे निवडून आलेले नाहीत, पण आदित्य ठाकरे निवडून आलेले आहेत.ही निवड ५ वर्षांसाठी असते.

१. उद्धव ठाकरे २. आदित्य ठाकरे ३. मनोहर जोशी ४. सुधीर जोशी ५. लीलाधर डाके ६. सुभाष देसाई ७. दिवाकर रावते ८. रामदास कदम ९. संजय राऊत १०. गजानन कीर्तीकर,

शिवसेना प्रमुख यांच्या अधिकारानुसार ज्या ४ जणांना ते पक्ष नेते ( राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य) म्हणून नियुक्त करु शकतात , त्यानुसार त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह ईतर ३ जणांची नियुक्ती केली. ( जी नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार हे शिवसेना प्रमुखाकडे असतात हे आपण वर वाचले आहे)
आता जर मुख्य शिवसेना पक्ष जर शिंदेंना ताब्यात घ्यायचा असेल तर त्यांना प्रतिनिधी सभेतून निवडून यावं लागेल, त्यात २५० पेक्षा जास्त सदस्य आहेत त्यांना सोबत घ्यावं लागेल तरच निवडणूक आयोग त्यांना मान्यता देऊन त्यांना शिवसेना पक्ष गृहीत धरू शकतो.आणि शिंदेंनी पक्षाची घटनाब दलविण्याचा प्रयत्न केला तर अपयशी ठरतील , कारण शिवसेनेच्या घटनेत हे अधिकार राष्ट्रीय कार्यकारणीला देण्यात आले आहेत(जिथे शिंदे गटाचे संख्याबळ कमी आहे) त्यातही वाद झाला तर शिवसेना प्रमुखांचा निर्णय अंतिम असेल.त्यामूळे शिंदेना वेगळा गट / पक्ष काढण्यापलीकडे पर्याय दिसत नाही.म्हणजेच शिवसेना पक्ष व चिन्ह यावर शिंदे गटाला दावा करता येणार नाही असंच सध्यातरी स्पष्ट होतं आहे.

हे पण वाचा :

10वी पास उमेदवारांना ECIL मध्ये नोकरीची संधी, उद्याची शेवटची तारीख

बँक ऑफ बडोदामध्ये सरकारी नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता

मोठी संधी.. 70,000 रिक्त जागांसाठी SSC नोटीस जारी, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Spread the love
Tags: #maharashtra #शिवसेना #उद्धव ठाकरे #राजकारण #पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांवर ईडीची मोठी कारवाई ; तब्बल इतक्या कोटीची संपत्ती जप्त

Next Post

शिंदे गटाला बसणार धक्का! ‘त्या’ 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर 5 वर्षांची निवडणूक बंदी?? सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल

शिंदे गटाला बसणार धक्का! 'त्या' 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us