Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्या पासून १२ वी च्या परीक्षा ; मोठी अपडेट जाणून घ्या

najarkaid by najarkaid
February 20, 2024
in जळगाव
0
आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. १९ – बुधवार दि. २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षांसाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लिखाणासाठी वेळ कमी पडू नये, यासाठी शेवटची १० मिनिटे  वाढवून दिली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी आनंददायी तसेच तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वीच्या लेखी परीक्षांना बुधवार दि. २१ फेब्रुवारी पासून सुरूवात होत आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये इयत्ता १२ वी साठी एकूण तीन हजार ३२० केंद्रांवर १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी परीक्षा देणार असून परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कमी गुण मिळालेल्या अथवा यशस्वी न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी जुलै महिन्यात पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

परीक्षा सुरळीत होण्यासाठी उपाययोजना

विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करता यावी यासाठी मंडळामार्फत सप्टेंबर महिन्यात संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. तर, परीक्षेचे अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात येऊन प्रवेशपत्रदेखील ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. परीक्षा निकोप व्हाव्यात, विद्यार्थ्यांचे परीक्षांबाबत दूरध्वनीद्वारे शंका समाधान व्हावे यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विभागीय मंडळ स्तरावर नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा देण्यात येत आहेत.

परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठीदेखील उपाययोजना केल्या जात आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाची मदत घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन मंत्री श्री.केसरकर यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप डॉ. केतकी पाटील यांच्यातर्फे शिवजयंती उत्सवांना उपस्थिती

Next Post

पत्रकार शिवाजी शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Related Posts

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post
पत्रकार शिवाजी शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

पत्रकार शिवाजी शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us