Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आगामी विधानसभा निवडणूक बाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलाचं मोठं विधान

najarkaid by najarkaid
October 2, 2021
in Uncategorized
0
बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे… चंद्रकांत पाटील यांचं थेट शिवसेनेला आव्हान
ADVERTISEMENT

Spread the love

आगामी काळात विधानसभेची मध्यावधी किंवा नियमित अशी कधीही निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व २८८ जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्यास भारतीय जनता पार्टी सज्ज आहे, असे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले.

ते म्हणाले की, महाविकास आघाडीतील घटकपक्ष ज्या प्रकारे एकमेकाशी भांडत आहेत ते पाहता ही आघाडी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल की नाही अशी शंका निर्माण होते. तथापि, सरकार पडेल की टिकेल याचा विचार न करता एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून भाजपा ठामपणे काम करत आहे. विदर्भ मराठवाड्यातील प्रचंड पुरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नसले तरी पूरग्रस्तांना भेटण्यासाठी मा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचा दौरा सुरू झाला आहे. राज्यात मध्यावधी किंवा नियमित अशी केव्हाही विधानसभा निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्याची भाजपाची तयारी आहे. लोकसभेच्याही राज्यातील सर्व ४८ जागा स्वबळावर लढविण्याची भाजपाची तयारी आहे. लोकसभा, विधानसभा किंवा महानगरपालिका अशा सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भाजपाने तयारी करावी अशी केंद्रीय नेतृत्वाची सूचना आहे. त्यानुसार संघटना काम करत आहे.

त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व ९७ हजार बूथमध्ये प्रत्येकी दहा पक्ष कार्यकर्त्यांच्या समित्या नेमण्याचे काम भाजपाने पूर्ण केले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान म्हणून मा. नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीस ७ ऑक्टोबर रोजी २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस राज्यातील बूथ समित्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधित करणार आहेत. त्यावेळी पक्षाचा संघटनात्मक विस्तार सर्वांना जाणवेल. प्रत्येक बूथमध्ये दहाजणांच्या समित्या स्थापन झाल्यावर पक्षाकडून आता प्रत्येकी १८० पर्यंत विस्तार करण्याचे काम सुरू आहे.

ते म्हणाले की, मतभेदानंतरही महाविकास आघाडीचे घटक पक्ष सत्तेसाठी एकत्र राहिले आणि भाजपाच्या विरोधात एकत्र लढले तरी निवडणुकीत त्यांचा सामना करण्याची तयारी भाजपाने केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर या वाढदिवसापासून ७ ऑक्टोबरपर्यंत भाजपातर्फे ‘सेवा आणि समर्पण पर्व’ साजरे करण्यात येत आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त शनिवारी मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात एका सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. जेट मशिनचा वापर करून हे सार्वजनिक शौचालय पूर्ण स्वच्छ करण्यात आले तसेच त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. आगामी आठ दिवसात कोथरूड मतदारसंघातील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांची विशेष स्वच्छता करण्यात येतील आणि त्यानंतर त्यामध्ये महिलांसाठी सॅनिटरी पॅड वितरणासाठी यंत्रे बसविण्यात येतील, असे मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

गांधी जयंतीनिमित्त त्यांनी गांधी खादी भांडारमध्ये खादीचे कापड खरेदी केले. कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये वाचनसंस्कृतीला मदत होण्यासाठी फिरते पुस्तक घर चालविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ मा. प्रदेशाध्यक्षांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे गांधी जयंती निमित्ताने प्रातिनिधीक अहिंसा सद्भभावना रॅली

Next Post

जळगावात नगरात दोन गटात दंगल; पोलिसांवरच केली दगडफेक

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
जळगावात नगरात दोन गटात दंगल; पोलिसांवरच केली दगडफेक

जळगावात नगरात दोन गटात दंगल; पोलिसांवरच केली दगडफेक

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us