Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आगामी निवडणुकांसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज ; २३ जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार

najarkaid by najarkaid
January 21, 2024
in राज्य
0
आगामी निवडणुकांसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज ; २३ जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार
ADVERTISEMENT

Spread the love

  • आगामी निवडणुकांसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज
  • २३ जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार
  • जिल्ह्यात ३५६४ मतदान केंद्र
  • १७८२ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग
  • जिल्ह्यात ९३३९ बॅलेट युनिट, ५४५० कंट्रोल युनिट आणि ५७३३ व्हीव्हीपीएटी मशिन

जळगाव, दि.२१ (प्रतिनिधी) –जिल्हा निवडणूक प्रशासन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. उद्या (दि.२३ जानेवारी) नवीन मतदारांच्या समावेशासह मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. सध्या पुरूष व महिला मिळून ३४ लाख ९१ हजार ९८ मतदार आहेत. यात सुमारे ऐंशी हजार नव मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात २०१९ लोकसभा निवडणूकीत ३५५९ मतदान केंद्र होती. या निवडणुकीत ५ मतदान‌ केंद्राची वाढ होत मतदान केंद्रांची संख्या ३५६४ झाली आहे.

जिल्ह्यात शहरी भागात १०६९ व ग्रामीण भागात २४९५ मतदान केंद्र आहेत‌. मतदान केंद्राच्या ठिकाणे शहरी भागात ४३०, ग्रामीण भागात १६०८ असे एकूण २०३८ ठिकाणे आहेत. याव्यतिरिक्त १४ ठिकाणी सहाय्यक मतदान केंद्र असू शकतात कारण त्याठिकाणी मतदारांची संख्या १५०० च्या वर आहे. १७८२ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगचे नियोजन करण्यात आले आहे. दुर्गम भागातील १६ मतदान केंद्रांवर मोबाईल नेटवर्क नाही.

सध्याच्या जिल्ह्यात ९३३९ बॅलेट युनिट, ५४५० कंट्रोल युनिट आणि ५७३३ व्हीव्हीपीएटी मशिन उपलब्ध आहेत.जिल्ह्याची लोकसंख्या ४७,४०,८८२ इतकी आहे. यात ३४,९१,०९८ मतदार संख्या आहे. मतदारांमध्ये १८,१२,००७ पुरूष तर १६,७८,९५६ महिला मतदार आहेत. तृतीयपंथी १३५ मतदार आहेत. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग १९२११ मतदार आहेत. ८० वर्षांवरील वयोमान असलेले १,०३,१२९ मतदार आहेत.

पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करू इच्छिणाऱ्या गैरहजर मतदाराने सर्व तपशील भरून फॉर्म १२डी द्वारे संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी (RO) कडे अर्ज करावा लागेल. पोस्टल बॅलेट सुविधेची मागणी करणारे असे अर्ज निवडणुकीच्या घोषणेच्या तारखेपासून संबंधित निवडणुकीच्या अधिसूचनेच्या तारखेपासून पाच दिवसांच्या कालावधीत आरओकडे पोहोचले पाहिजेत.असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी केले आहे.

दोन मतदान अधिकार्‍यांचा समावेश असलेले मतदान पथक, एक व्हिडिओग्राफर आणि एक सुरक्षा व्यक्ती, मतदाराच्या घरी भेट देतात आणि मतदानाची संपूर्ण गुप्तता राखून मतदाराला पोस्टल बॅलेटवर मतदान करण्यास सांगतात. असे मतदार घरबसल्या मतदान करू शकतात. असे श्री.चिंचकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत, पुरुषांपेक्षा ७२ टक्क्यांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे. लिंग गुणोत्तर दर १००० पुरुषांमागे ९२७ महिला असे आहे. यात सुधारणा झाली आहे.

२७ ऑक्टोबर २०२३ ते १७ जानेवारी २०२४ या कालावधीत १८-१९ वयोगटातील मतदारांची संख्या १६२२९ वरून ३८२९६ झाली आहे.

२०२२ पासून जिल्ह्यात एकूण ६३७११ मतदारांची वाढ झाली आहे. २४३०१५ मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत, तर ३,०६,७२६ मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. २३ जानेवारी २०२४ रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

नवीन निवडणूक फोटो ओळखपत्र २,९१,१७१ छापण्यात आले आहेत. टपाल विभागाकडून २,३६,०११ निवडणूक छायाचित्र ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. ५५,१६० कार्डचे लवकरच वितरण केले जाणार आहे. असे श्री.चिंचकर यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोग व राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्यातील आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी व मतदार जागृती कार्यक्रमाचा दर आठवड्याला आढावा घेतला जात आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तयारीबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

००००००००००००००००००००

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारत का बच्चा बच्चा…या गाण्यावर शिक्षिका आणि विदयार्थ्यांचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल

Next Post

शरद पवारांबद्दल मोठा गौप्यस्फोट; वाचा सविस्तर

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
शरद पवारांचं निकालावर भाष्य; म्हणाले “ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात जावं”

शरद पवारांबद्दल मोठा गौप्यस्फोट; वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us