Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अयोध्येत श्री राममंदिर-मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणं आयुष्यातील सर्वांग सुंदर अनुभूती होती – अशोक जैन

najarkaid by najarkaid
January 26, 2024
in राष्ट्रीय
0
अयोध्येत श्री राममंदिर-मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणं आयुष्यातील सर्वांग सुंदर अनुभूती होती – अशोक जैन
ADVERTISEMENT

Spread the love

अयोध्येत श्री राममंदिर-मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या सोहळ्याचे अनुभव कथन करताना वडील मोठ्या भाऊंच्या ‘सार्थक करूया जन्माचे..’ या वाक्याने प्रारंभ करून अनुभवलेला ४९५ वर्षाच्या बहुप्रतीक्षित अयोध्यातील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा व त्याप्रसंगीचे मंगलमय क्षण, भक्तिमय वातावरण, अनेकांच्या चेहऱ्यावरील उत्साह, शिस्तबद्ध नियोजन,प्रांगणात प्रवेश करताच मंगलमय वातावरण.. अप्रतिम आर्किटेक्चरमध्ये उभे राहिलेले मंदिर.. अन् गर्भगृहात विराजमान रामलल्लाची हृदयाशी थेट संवाद साधणारी मूर्ती असं सारं वातावरणचं खास होतं अयोध्येतील मंगलमय व प्रसंगी भावपूर्ण बनलेल्या वातावरणाचे वर्णन अशोकभाऊ जैन यांनी गुरुवार दिनांक २५ रोजी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी केले.

जळगाव जिल्ह्यातील ७ जणांना निमंत्रण 

अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. देशभरातून संत- महंतांसह विविध क्षेत्रातील मोजक्या अडीच हजार जणांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. त्यात जळगाव जिल्ह्यातून एकूण सात जणांना निमंत्रित करण्यात आले होते.चार महंत, बौद्ध समाजाचे भन्ते, अॅड. उज्ज्वल निकम व अशोक जैन यांना निमंत्रण होते. श्री. जैन यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना अयोध्येतील मंगलमय व प्रसंगी भावपूर्ण बनलेल्या वातावरणाचे वर्णन केले.

आमच्या परिवाराचा ८८० वर्षांचा इतिहास उपलब्ध

महाराष्ट्रातील ही आमची बत्तीसावी पिढी. आमचा ८८० वर्षांचा इतिहास उपलब्ध असून महाराष्ट्रात येवून १२८ वर्ष झाली. आमच्या घर-घराण्याला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याची परंपरा आहे. आमचे जे पूर्वज आमच्या सोबत नाहीत त्या सर्वांचा तसेच आमच्या आई-वडिलांचा दिव्य आशिष आम्हाला लाभला असून थोरामोठ्यांचे आशीर्वाद ही पाठीशी आहेत. जळगाव जिल्हा वासियांचा-आपणासर्वांचा सदिच्छेमुळे मला अयोध्या येथील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. १४० कोटींच्या वर लोकसंख्या असेलेल्या या महान भारत वर्षातून तसेच जळगाव जिल्ह्यातील ५० लाख नागरिकांच्या वतीने अयोध्या येथील रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले.

आयुष्यातील सर्वांग सुंदर अनुभूती 
आयुष्याच्या या वाटचालीत अयोध्या येथे प्रभू श्री रामलल्लाचे आगमन, प्राण प्रतिष्ठा तसेच मंदिर निर्माणानिमित्त अयोध्या येथे जाण्याचं मला सौभाग्य प्राप्त झालं, ही माझ्या आयुष्यातील सर्वांग सुंदर अनुभूती आहे! माझ्या वडिलांच्या शब्दात सांगायचे तर Leave this word better than you found it – सार्थक करूया जन्माचे, रुप पालटू वसुंधरेचे!- आयुष्याच्या प्रत्येक पावलावर प्रत्येक क्षेत्रात माझ्या वडिलांचे हे ब्रीद वाक्य सत्यात उतरवण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो. या घटनेमुळे तर मी निश्चितच सविनय मात्र अभिमानाने सांगू इच्छितो की, माझ्या वडिलांच्या या ब्रीद वाक्याचा अर्थ पूर्णपणे सार्थक झाला आहे निमंत्रण देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहकार्यवह स्वानंद झारे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री ललित चौधरी आणि जिल्हा कार्यवाह हितेश पवार यांनी दि. १६ जानेवारी २०२४ रोजी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या यांच्यावतीने मला आमंत्रण दिले. दि. २२ तारखेला लाभलेली अनुभूती म्हणजे सनातन धर्मात जगातील सर्वात मोठा सनातन धर्माचा उत्सव संपन्न झाला असेच म्हणता येईल.

जगातील सर्वात मोठं धार्मिक आणि अध्यात्मिक स्थळ अयोध्याचं 

व्हॅटीकनसिटी येथे ख्रिश्चन धर्मीय एक करोडच्यावर दरवर्षी भेट देत असतात. मक्का मदीना येथे दोन ते तीन कोटीच्या दरम्यान मुस्लीम भेट देत असतात. गोल्डन टेम्पल येथे तीने ते साडेतीन करोड, तिरुपती येथे तीन ते चार करोड भेट देतात. अयोध्या येथे मात्र दरवर्षी पाच करोड भाविक भेट देतील हे नक्की! जगातील सर्वात मोठं धार्मिक आणि अध्यात्मिक स्थळ अयोध्या हेच असणार असल्याचा उल्लेखही अशोक जैन यांनी केला.

भाग्यवंत म्हणो तया
नेत्री पाहिले रामराया ।
प्राणप्रतिष्ठा सोहळा
याची डोळा पाहिला ।
पूर्वसूकृत कामी आले
अयोध्येसी जाणे झाले।

कान्हदेश आणि अयोध्याचा संदर्भ
२२ तारखेला जगातील सर्वात मोठा उत्सव साजरा झाला. अयोध्या नगरीत रामलल्लाच्या प्रतिमेची प्राण प्रतिष्ठा झाली. सर्व जग त्या क्षणाची आतुरतेनी वाट पहात होते कान्हदेश आणि अयोध्याचा संदर्भ देतांना अशोक जैन म्हणाले की, अयोध्या नगरीच्या आंतरराष्ट्रीय विमान तळाला वाल्मिक ऋषीचे नावं देण्यात आले आहे, हनुमानाची मूर्ती तर प्रत्येक ठिकाणी रामा सोबत आहे, जटायूचीही मूर्ती राम मंदिरात बसविण्यात आली आहे, मंदिरातील भोजन कक्षाला शबरीच नावं देण्यात आले आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यां तळोद्याच्या मल्हारराव होळकर यांच्या सून. ब्रिटिश सत्ता स्थापन होण्या आधी खान्देश होळकर राज्याचा भाग होता. त्या खान्देश राणीची अहिल्यादेवींचीही मूर्तीही राम मंदिरात बसविण्यात येणार आहे, थाळनेरच्या लता मंगेशकर यांचं नावं एका मुख्य चौकाला देण्यात आले आहे, सरदार पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. याच्या पेक्षा उंच रामाचा पुतळा आयोध्येत बसाविण्याची योजना आहे. हां पुतळा गोंदूर धुळे येथील राम सुतार तयार करणार आहेत,सोनगीर हे तांबे पितळीच्या भांडयासाठी प्रसिद्धी आहे. या तांबट कासाराणी 200 ताब्याचे नक्षीदार कळस तयार करून आयोध्येलां पाठविले आहेत. या कळसानें रामलल्ला वर प्राण प्रतिष्ठाच्या वेळी जलाभीषक होणार आहे.मला वाटत आयोध्येत एवढा मोठा सन्मान जो कान्हदेशचा झाला हां मान ईतर कोणालाही मिळाला नसेल असंही अशोक जैन यावेळी म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबईत कुणबी जात प्रमाणपत्राच्या वितरणासाठी ‘या’ दिवशी शिबिर ; ठिकाणांची यादी व संपर्क क्रमांक वाचा

Next Post

चेक अनादर प्रकरणी न्यायालयाचा दोन आरोपींना एकाच दिवशी शिक्षा सुनावत दणका

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
चेक अनादर प्रकरणी न्यायालयाचा दोन आरोपींना एकाच दिवशी शिक्षा सुनावत दणका

चेक अनादर प्रकरणी न्यायालयाचा दोन आरोपींना एकाच दिवशी शिक्षा सुनावत दणका

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us