Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला दिला भयंकर मृत्यू

Editorial Team by Editorial Team
April 1, 2022
in राज्य
0
भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : जिल्ह्यातील दहिगाव शिवारात एक खळबळजनक घटना उघडकीस आलीय.  या परिसरात काही दिवसापूर्वी एका व्यक्तीचा दोन तुकडे करून फेकून देण्यात आलेला मृतदेह आढळला होता. त्याची ओळख पटविण्यासह या खुनाचा उलगडा करण्यात पिशोर पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानेच त्या व्यक्तीचा काटा काढण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले. संदीप बाळा मोकासे (वय 35, रा. शफेपूर, पिशोर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दहिगाव शिवारात एका कॅरिबॅगमध्ये व खताच्या गोणीत भरून रस्त्यापासून दीडशे फुटावर लांब टाकलेला एक अर्धवट मृतदेह काहींना आढळला होता. पिशोर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तो ताब्यात घेतला. शनिवारी रात्रभर सपोनि. कोमल शिंदे व सहकाऱ्यांनी परिसरात शोध घेतला; मात्र मृतदेहाचा कमरेखालील भाग मिळाला नाही. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद घाटीत नेला असता, मारहाण करून, गळा कापून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सपोनि शिंदे यांनी तपासचक्रे फिरवून कर्मचाऱ्यांच्या टीम तयार करून तपासकामी पाठविले. यात शफेपूर येथील संदीप बाळा मोकासे हा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्याच्या पत्नीचे गावातील सुनील सावजी हरणकाळ व शशिकांत ऊर्फ (छोटू) नारायण मोकासे यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मृताच्या उसाच्या शेतात पाहणी केल्यानंतर तेथे पोटाच्या आतडीचा काही भाग मिळाला. यानंतर मृत हा संदीप बाळा मोकासे असल्याचे निष्पन्न झाले. हा तपास सपोनि. कोमल शिंदे, उपनिरीक्षक विजय आहेर, उपनिरीक्षक विजय जाधव व स्टाफ, सहा. फौजदार सोनाजी तुपे, माधव जरारे आदींनी केला.

सुनील सावजी हरणकाळ व शशिकांत नारायण मोकासे यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसी खाक्या दाखवताच पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने त्याला शेतात नेऊन धारदार शस्त्राने डोक्यात मारून गळा कापल्याचे सांगितले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे कमरेपासून दोन तुकडे केले. धडाचा भाग कॅरिबॅगमध्ये बांधून गोणीत टाकून दहिगाव शिवारात टाकला. कमरेखालील भाग जवळच गट नंबर 95 मधील विहिरीत फेकून दिल्याचे सांगितले. आरोपींनी संदीप मोकासेचा शरीराचा अर्धा भाग कापून विहिरीत फेकला होता. पोलिसांनी त्या विहिरीतून गळाच्या साहाय्याने पांढऱ्या रंगाची गोणी काढली. यात कमरेखालचा भाग कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संजय राजभोज यांनी जागेवरच उत्तरीय तपासणी केली. दोनच दिवसांत पिशोर पोलिसांना गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश मिळाले. आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता, 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजपासून घर बांधणे झाले महाग! गृहकर्ज घेतल्यावर ही अतिरिक्त सवलत मिळणार नाही

Next Post

राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त, काय आहे नवे दर जाणून घ्या?

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त, काय आहे नवे दर जाणून घ्या?

राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त, काय आहे नवे दर जाणून घ्या?

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us