Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे, ८७ रेशन दुकाने निलंबित तर ४८ दुकानांचे परवाने रद्द : छगन भुजबळ

najarkaid live by najarkaid live
April 23, 2020
in राज्य
1
केशरी रेशन कार्ड ऑनलाईन नसले तरी धान्य मिळणार !
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक, दि. २३,- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील एकही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर जोखमीची जबाबदारी आहे. या काळात नागरिकांना अन्न धान्य वाटपाची जबाबदारी स्वस्तधान्य दुकानदारांवर असून रेशन धान्य वाटप करतांना अनियमितता तसेच नियमांचे पालन न केलेल्या दि.१९ एप्रिल २०२० पर्यंत राज्यातील एकूण ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ८७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आहे तर एकूण ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच यापुढेही स्वस्तधान्य दुकानांमध्ये काळाबाजार, वाटप करतांना कमी धान्य देणे किवा जास्त पैसे घेणे तसेच नियमांचे पालन केले जात नसेल तर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात एकूण सहा महसुली विभाग असून यामध्ये नागपूर, अमरावती,औरंगाबाद, नाशिक, पुणे व कोकण विभागाचा समावेश आहे. या सहाही विभागात लॉकडाऊनच्या काळात एकूण एकूण ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ८७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आहे तर एकूण ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. राज्यातील या वितरण व्यवस्थेवर अन्न,नागरी पुरवठा विभागाच्या वतीने काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात आले असून निर्माण करण्यात आलेल्या पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे, असे मंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले आहे.

राज्याच्या नागपूर महसूल विभागात एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आले असून १८ रेशन दुकानांचे निलंबन तर १ दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ११ दुकानांवर निलंबित करण्याची कार्यवाही झालेली असून त्या खालोखाल वर्धा ४ दुकानांवर कार्यवाही झालेली आहे. रेशन दुकान रद्द केल्याची एकमेव कार्यवाही नागपूर शहर भागात करण्यात आली असून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अमरावती महसूल विभागात एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आले असून ७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले तर १३ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अमरावती विभागात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ३ दुकानांवर निलंबित करण्याची कार्यवाही झालेली असून ५ दुकानांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही वाशीम जिल्ह्यात करण्यात आलेली आहे. तर त्या खालोखाल बुलढाणा जिल्ह्यात ४ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रत्येकी २ गुन्हे अमरावती व अकोला जिल्ह्यात दाखल करण्यात आलेले असून त्या खालोखाल बुलढाणा जिल्ह्यात १ गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

औरंगाबाद महसूल विभागात २९ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले असून ४ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक १२ रेशन दुकानांवर तर त्या खालोखाल उस्मानाबाद जिल्हात ५ रेशन दुकानांवर निलंबनाची कार्यवाही झालेली आहे. तसेच जालना आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी २ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे.

*नाशिक महसूल विभागात एकूण १६ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले तर १५ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी ३ दुकानांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात ७ तर त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात ४ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच अहमदनगर व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी ७ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.*

पुणे महसूल विभागात एकूण ४ गुन्हे नोंदविण्यात आले असून १७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले असून १४ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. पुणे विभागात सर्वाधिक पुणे जिल्ह्यात ११ दुकानांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात ८ रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले असून पुणे जिल्ह्यात ३ दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोकण महसूल विभागात एकूण ९ गुन्हे नोंदविण्यात आले असून ७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. तर १ दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कोकण विभागात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात ४ रेशन दुकाने निलंबित करण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यात १ रेशन दुकानाच परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ४ गुन्हे तर त्या खालोखाल रायगड जिल्ह्यात ३ दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

परवाना रद्द ; मद्यपान करुन रेशन वाटपासह होत्या अनेक तक्रारी !

Next Post

अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम वितरीत !

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post

अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम वितरीत !

Comments 1

  1. Samadhan popat Patil says:
    6 years ago

    Rashan kard aahe pan12 aanki number naslya mude aamala rashan midat Nani pachora tal pachora dist.jalgaon

ताज्या बातम्या

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us