पाचोरा – दि.24/05/2024 रोजी नाशिक येथील गुरुदक्षिणा सभागृह,कॉलेज रोड या ठिकाणी भव्य दिव्य असा “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०१४” वितरण सोहळा पार पडला यावेळी महाराष्ट्र शिक्षक पॅनल (एम एस पी) कडून राजेन्द्र कोळी सरांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारने सन्मानित करण्यात आले त्याप्रसंगी कर्याक्रमाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शिक्षक पॅनल (MSp) प्रमुख श्री.दीपक चामे सर, प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी
शहाणे, प्रसिद्ध कवी अनंतजी राऊत सर,आदि उपस्थित होते.यावेळी शिक्षक मित्र परिवार तसेच राज्य मराठी पत्रकार संघाचे किशोर रायसाकडा यांच्या कडुन राजेंद्र कोळी सर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या









