ऐकावे ते नवलंच…. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही,नणंद आणि भावजयीच्या नात्याने वेगळंच वळण घेतल्याने कुटुंब चांगलंच हादरलं आहे. एकाच कुटुंबातील नणंद आणि भावजय यांच्यातील समलैंगिक संबंध कुटुंबातील सदस्यांना माहिती पडल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावरील रंगाचं उडाला. दोघी जणींच्या प्रेमात इतका आकंठ बुडाला की, त्यांनी अनेकदा समलैंगिक संबंध प्रस्थापित केले. पण एकेदिवशी कुटुंबियांनी त्यांना नको त्या अवस्थेत बघितलं आणि सगळा भांडाफोड झाला.पुन्हा असे कृत्य केल्यास खबरदार, असा सज्जड दम कुटुंबियांनी त्यांना दिला. पण दोघींनीही कुटुंबियाचं म्हणणं मनावर घेतलं नाही.
कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ
आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!
धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध
जळगावातील हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई ; दोघा आरोपिंना घेतले ताब्यात
१० वी चा निकाल ‘या’ तारखेला लागणार ; शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती
जळगावात एकाचा निघृण खून ; घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
कुटुंबियांची पोलिसांत धाव….
नणंद आणि भावजय या दोघीना सज्जड दम देऊनही त्यांनी आपल्या समलैंगिग संबंधाला आवर न घालता पुन्हा तेच सुरु अशीच परिस्थिती असल्याने अखेर दोघींना वेगळं करण्यासाठी कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली असून हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात घडली. पोलिसांनी नणंद-भावजयीची समजूत काढावी, अशी विनंती कुटुंबियांनी केली आहे. प्रकरण ऐकूण पोलिसही चक्रावून गेले आहेत.
सविस्तर असे की,उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरात राहणाऱ्या तरुणीचे लग्न झाले होते. काही दिवसाच्या सुखी संसारानंतर या महिलेने पतीसोबत दुरावा निर्माण केला. तिने अनेकदा पतीला शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. पत्नीचे वागणे पाहून पतीच्या मनात शंका निर्माण झाली.त्याने पत्नीवर नजर ठेवली असता, त्याला समोर जे दिसलं ते पाहून पतीच्या पायाखालची जमीनच सरकरली. आपली पत्नी आपल्याच बहिणीसोबत शरीरसंबंध ठेवत असल्याचं तरुणाने बघितलं. त्याने दोघींनाही विचारण केली असता आपले एकमेकींवर प्रेम असल्याचं त्यांनी सांगितलं.
अखेर कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. दोघींनाही दूर करा, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. प्रकरण ऐकूण पोलिसही चक्रावून गेले. त्यांनी नणंद आणि भावजयीला बोलावून समज देण्याचा प्रयत्न केला. पण दोघीही एकमेकांपासून दूर होण्यास तयार नाहीये.
आम्हाला लग्न करून सुखी संसार करायचा आहे, असा हट्ट त्यांनी धरला आहे. नणंद भावजयीच्या या प्रेमप्रकरणामुळे पोलिसांची देखील चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. सध्या पोलीस याबाबत वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेत आहेत. या प्रेमप्रकरणाची शहरात मोठी चर्चा रंगली आहे.










