जळगाव, (प्रतिनिधी)- पद्मश्री ॲड. उज्वल निकम (Ujwal Nikam Jalgaon Satkar) यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा – जळगावकरांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचं नागरी सन्मान सोहळा समितीचे अध्यक्ष अशोक जैन (Ashok jain )यांनी आज दिनांक २२ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं.

पत्रकार परिषदेत माहिती देतांना अशोक जैन (Ashok jain)यांनी कार्यक्रमाची माहिती देतांना पुढे सांगितलं की,महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ विधिज्ञ, विशेष सरकारी वकील आणि नुकतेच राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशित झालेल्या पद्मश्री अॅड. उज्वल निकम यांचा (Ujwal Nikam Jalgaon Satkar) भव्य नागरी सत्कार सोहळा २७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, महाबळ परिसर, जळगाव येथे संपन्न होणार आहे.
या गौरव सोहळ्याचे आयोजन “पद्मश्री अॅड. उज्वल निकम नागरी सन्मान सोहळा (Ujwal Nikam Jalgaon Satkar समिती, जळगाव” यांच्यातर्फे करण्यात आले असून, या कार्यक्रमाला राज्य व केंद्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला असून सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे:
सकाळी ६.१५ वाजता अॅड. उज्वल निकम यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन होणार असून, त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण केले जाईल. त्यानंतर रेल्वे स्टेशनपासून बॅरिस्टर निकम चौकापर्यंत स्वागत मिरवणूक काढण्यात येणार आहे. भाजप कार्यालय आणि जी. एम. फाउंडेशन येथे छोटेखानी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

मुख्य नागरी सत्कार सोहळा सायंकाळी ५ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात होणार आहे.
सत्कार समारंभाला उपस्थित राहणारे प्रमुख मान्यवर:
प्रा. डॉ. एन. के. ठाकरे (माजी कुलगुरू, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ), ना.रक्षा खडसे (केंद्रीय राज्यमंत्री, भारत सरकार), ना.गिरीश महाजन (जलसंपदा मंत्री), ना.गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा व पालकमंत्री, जळगाव), ना.संजय सावकारे (वस्त्रोद्योग मंत्री),ना. जयकुमार रावळ (पणन व राजशिष्टाचार मंत्री), खा.स्मिता वाघ,विधान परिषद आमदार एकनाथराव खडसे, किशोर दराडे, सत्यजित तांबे,
आ.सुरेश भोळे, आ.किशोर पाटील, आ.अनिल पाटील, आ.मंगेश चव्हाण, आ.चंद्रकांत पाटील, अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मीनल करनवाल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद), महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), ज्ञानेश्वर ढेरे (आयुक्त तथा प्रशासक, महापालिका, जळगाव).(Ujwal Nikam Jalgaon Satkar)
या कार्यक्रमासाठी जळगाव शहर व जिल्ह्यातील प्रतिष्ठित मंडळींचा समावेश असलेली ‘नागरी सन्मान सोहळा समिती’ स्थापन करण्यात आली आहे. या समितीत अनेक मान्यवर, उद्योजक, डॉक्टर्स, वकील व समाजसेवक यांचा समावेश आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन पद्मश्री अॅड. उज्वल निकम नागरी सन्मान सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.(Ujwal Nikam Jalgaon Satkar)

कार्यक्रम आयोजन समिती :
पद्मश्री अॅड. उज्वल निकम नागरी सन्मान सोहळा समितीत सहभागी मान्यवर –
अशोकभाऊ जैन (समिती अध्यक्ष), भरतदादा अमळकर, नंदकुमार बेंडाळे, भालचंद्र पाटील, डी. डी. बच्छाव (बापू), अॅड. नारायण लाठी, अनिश शहा, करीम सालार, अॅड. सुशील अत्रे, शंभू पाटील, डॉ. शिरीष बर्वे, नंदू अडवाणी, डॉ. राजेश पाटील, हरीश मुंदडा, अॅड. सुरेंद्र काबरा, डॉ. राहुल महाजन, राहुल पवार, जगन्नाथ बाविस्कर, राजेश झाल्टे, दिलीप तिवारी, डॉ. प्रीती अग्रवाल, राम पवार, युसुफभाई मकरा, संतोष इंगळे,
प्रमोद नाना पाटील, सुरेंद्र पाटील, श्रीराम पाटील, ललित चौधरी, जितेंद्र लाठी, रोहित निकम, संग्रामसिंह सूर्यवंशी, प्रकाश बालानी, राजेंद्र नन्नवरे, अरविंद देशमुख, उज्वल चौधरी, एजाज मलिक, संजय पवार, अशोक लाडवंजारी, राजेंद्र पाटील, सुनील पाटील, कल्पेश छेडा, अमित भाटीया, जितेंद्र पाटील, विरेंद्र पाटील, प्रशांत नाईक, रितेश निकम, अमर देशमुख, विकास भदाणे, हर्षाली चौधरी, डॉ. विकास बोरोले, डॉ. मनीष चौधरी, रोहन बाहेती, अतुलसिंह हाडा, श्याम कोगटा, श्याम तायडे, नितीन लढा,
बंडूदादा काळे, सुनील भंगाळे, दीपक सूर्यवंशी, राधेश्याम चौधरी, विनोद देशमुख, अभिषेक पाटील, शरद तायडे, डॉ. केतकी पाटील, सचिन नारळे, रविंद्र लढा, प्रीतम रायसोनी, अशोक राठी, पंकज जैन, गिरीश सिसोदिया, मनोज (पिंटू) काळे, गजानन (मामा) देशमुख, उज्ज्वला बेंडाळे, योगेश कलंत्री, डॉ. सुरेश पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, भीमराव मराठे, संतोष पाटील, राहुल तोडकर, ललिता पाटील, संगीता पाटील, सुनील मोर, अनिल अडकमोल, मनोज सोनवणे, विराज कावडिया, राजेश डी. पाटील
बातम्या… तुम्ही वाचल्यात का?
जगात असा कोणता सजीव आहे जो वाऱ्यापेक्षा जलद धावतो?”
आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा
Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय
murder news : पतीचा खून करून घरातच मृतदेह पुरला… टाईल्स लावून गुन्हा लपवला!
थरकाप उडवणाऱ्या हत्येने खळबळ ;पती अडथळा ठरत होता प्रेमात?
१३ वर्षाच्या मुलीच्या पोटदुखीच्या तपासणीत उघड, अल्पवयीन मुलगी 5 महिन्यांची गर्भवती, पालकांना धक्का!
फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?
बांधकाम कामगारांसाठी मोठी बातमी! पेन्शन योजना सुरु, असा करा अर्ज!
संशयाचं भूत डोक्यात शीरलं, रक्तरंजित शेवट ; पतीकडून पत्नीचा खून!
Instagram friendship rape case | सोशल मीडियावरचा साप! इंस्टाग्रामवर ओळख, अल्पवयीन मुलीवर अत्याचार!
WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध
PM Kisan Samman Nidhi: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 20 वा हप्ता – तुमचं नाव यादीत आहे का?
“Supreme Court ची थेट विचारणा – ‘हॉटेलमध्ये वारंवार गेलीस कशासाठी?’”
Maharashtra Teacher Quality Award | आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नवे निकष!
Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी
Illegal Relationship Murder |मुंबईत वाद, डेटिंगमुळे हत्या : वाढत्या गुन्हेगारीने वाढतेय चिंता
आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही १५०० रुपये
‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड
Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया