Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेच्या महाविजय रथ यात्रेला जनसागर लोटला

najarkaid by najarkaid
January 9, 2026
in Uncategorized
0
शिवसेनेच्या महाविजय रथ यात्रेला जनसागर लोटला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव नजरकैद न्यूज । ८ जानेवारी २०२६ । जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ आज गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता.

मात्र ऐनवेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा अचानक रद्द झाला. तरीही शिवसेनेने प्रचारात कोणताही खंड पडू न देता उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अनुपस्थितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या अन्य नेत्यांसह, पदाधिकाऱ्यांना सोबत घेत नियोजित रोड शोला सुरुवात केली. यावेळी महाविजय रथ यात्रेला जनसागर लोटला गेला होता.

दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो झाला होता. यानंतर आज गुरुवारी जळगाव शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोड शो निमित्त जय्यत तयारी करण्यात आली होती. महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रोड शोसाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी आकर्षक स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. बॅनर्स, झेंडे, फलक लावून संपूर्ण मार्ग भगवेमय करण्यात आला होता. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला दिसून येत होता. मात्र, ऐनवेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द झाला. यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसले.

तरीही शिवसेनेने प्रचारात कोणताही खंड पडू दिला नाही. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अनुपस्थितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या अन्य नेत्यांसह, पदाधिकाऱ्यांना सोबत घेत नियोजित रोड शोला सुरुवात केली.

ठरलेल्या वेळेनुसार रोड शोच्या माध्यमातून जळगाव शहरातील विविध मार्गावरून प्रचार रॅली काढण्यात आली. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या रोड शोमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, स्थानिक नेते आणि उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोड शो दरम्यान पालकमंत्री पाटील यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून जळगाव शहरात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली असून जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेना आणि महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रभाग क्र. ३ मध्ये अपक्ष उमेदवार मीनताई धुडकु सपकाळे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली; नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

Next Post

मुंबईचा ‘मराठी टक्का’ आणि सत्तेची २५ वर्षे; अस्मितेचा जागर की केवळ राजकीय वापर?

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
मुंबईचा ‘मराठी टक्का’ आणि सत्तेची २५ वर्षे; अस्मितेचा जागर की केवळ राजकीय वापर?

मुंबईचा ‘मराठी टक्का' आणि सत्तेची २५ वर्षे; अस्मितेचा जागर की केवळ राजकीय वापर?

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us