Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र शासनाचे ७५० कोटी रुपयांचे विविध कालावधीचे कर्ज रोखे विक्रीस

najarkaid by najarkaid
August 29, 2025
in Uncategorized
0
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र शासनाच्या १४, १५, २९ व ३० वर्षे मुदतीच्या प्रत्येकी ७५० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी प्रत्येक रोख्यासाठी स्वतंत्र पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

०२ सप्टेंबर, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई फोर्ट येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् ०२ सप्टेंबर, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल त्याच दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान ०३ सप्टेंबर, २०२५ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कालावधी १४ व १५ वर्षे मुदतीच्या कर्जरोख्यांचा कालावधी २५ जून, २०२५ रोजी पासून सुरू होईल. कालावधी २९ व ३० वर्षे मुदतीच्या कर्जरोख्यांचा कालावधी ०६ ऑगस्ट, २०२५ रोजी पासून सुरू होईल.

१४ वर्ष कालावधीच्या कर्जरोख्याची परतफेड दिनांक २५ जून, २०३९ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. कर्जरोख्याचा व्याजाचा दर हा ७.०८% दरसाल दर शेकडा एवढा असेल. तर १५ वर्ष कालावधीच्या कर्जरोख्याची परतफेड दिनांक २५ जून, २०४० रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. कर्जरोख्याचा व्याजाचा दर हा ७.०४% दरसाल दर शेकडा एवढा असेल. कालावधी १४ व १५ वर्षे मुदतीच्या व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक डिसेंबर २५ आणि जून २५ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

२९ वर्ष कालावधीच्या कर्जरोख्याची परतफेड दिनांक ०६ ऑगस्ट, २०५४ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. कर्जरोख्याचा व्याजाचा दर हा ७.१७% दरसाल दर शेकडा एवढा असेल. तर ३० वर्ष कालावधीच्या कर्जरोख्याची परतफेड दिनांक ०६ ऑगस्ट, २०५५ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. कर्जरोख्याचा व्याजाचा दर हा ७.१६% दरसाल दर शेकडा एवढा असेल. कालावधी २९ व ३० वर्षे मुदतीच्या व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक फेब्रुवारी ०६ व ऑगस्ट ०६ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

Spread the love
Tags: #ajitdadapawar #ncp #mantralaynirnay#maharashtra #bjp #devendra fadanvis #mangesh chavhan #sharad pawar #राजकारण#maharashtrashasan
ADVERTISEMENT
Previous Post

सियाल इंडिया 2025 मध्ये ‘उमेद’चा डंका

Next Post

मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्यायचे का हे राऊत, पवार, उबाठांनी सांगावे

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्यायचे का हे राऊत, पवार, उबाठांनी सांगावे

मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्यायचे का हे राऊत, पवार, उबाठांनी सांगावे

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us