जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव लोकसभा भाजपचा बालेकिल्ला वगैरे काही नाही म्हणत मोदीनीं जानेतेला भ्रमित करून फसवणूक केल्याची टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज जळगाव येथे केली.
महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा उमेदवार करण पवार व रावेर लोकसभा उमेदवार श्रीराम पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज दिनांक 24 रोजी शिवसेना नेते खा. संजय राऊत जळगावात आले आहेत. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले नशीब त्यांनी पन्नास लाख लीड मिळेल असं सांगितलं नाही. जळगाव लोकसभा प्रचार्थ आयोजित मेळाव्यात मंत्री गिरीश महाजन यांनी दोनही उमेदवारांना पाच लाखाचा लीड मिळणार असल्याचे सांगितलं होतं यावरून पत्रकारांनी राऊत यांना प्रश्न विचारला त्यावर त्यांनी गिरीश महाजनांना टोला लगावला.










