बिहारमध्ये एका महिलेने प्रियकरासोबत पतीला मारहाण करून विजेचा करंट देत हत्या केली. मृतदेहाजवळ शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर आरोप.
एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पतीला मारहाण करून विजेचा करंट देऊन हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती बिहार राज्यातून समोर आली आहे.

संबंधीत बातम्या👇🏻
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर
हत्येआधीचा वाद
शुक्रवारी रात्री पती सोनू झा याने आपल्या पत्नी अस्मिता आणि तिचा प्रियकर हरिओमला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. यामुळे संतापलेल्या सोनूने हरिओमला मारहाण केली. मात्र, सोनू नशेत असल्याचा फायदा घेत हरिओमने त्याच्यावर भांड्याने व लाठ्यांनी वार केले. अर्धमेला झाल्यावर, त्याच्या गळ्यात विजेच्या तार गुंडाळून त्याला करंट देण्यात आला.
मृतदेहाजवळ शारीरिक संबंधाचा आरोप:
या घटनेनंतर अस्मिता व हरिओमने मृत सोनूच्या शवाजवळ शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही क्रूर घटना घडवून आणल्यानंतर, सकाळी अस्मिताने शेजाऱ्यांपुढे करंट लागून पतीचा मृत्यू झाल्याचा बनाव केला.

वडिलांनी उघड केला खरा प्रकार:
सोनूचे वडील टूनटून झा यांनी आरडाओरडा ऐकून खोलीत धाव घेतली असता त्यांनी रक्ताने माखलेली भिंत आणि बिछाना पाहिला. सोनूचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता, डोळ्यांवर सूज आणि शरीरावर गंभीर जखमांचे अनेक निशाण होते. डाव्या हाताची बोटे जळालेली होती. त्यांना लगेच खूनाचा संशय येऊन त्यांनी पोलिसांना कळवले.
पोलिसांचा तपास सुरू:
घटनास्थळी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. एएसपी संजय पांडे यांनी सांगितले की, “डोक्यावर आणि हातांवर जखमांचे निशाण आहेत, विजेची तार देखील सापडली आहे. सध्या प्रियकर हरिओम फरार असून त्याचा शोध सुरू आहे.”
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी