Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Chess Championship : जळगावात रंगणार बालचमूंचा बुद्धिबळ महासंग्राम!

जैन हिल्सच्या अनुभूती मंडपममध्ये २७५ बुद्धीबळ पटाची हायटेक व्यवस्था

najarkaid by najarkaid
August 1, 2025
in जळगाव
0
Chess Championship : जळगावात रंगणार बालचमूंचा बुद्धिबळ महासंग्राम!
ADVERTISEMENT

Spread the love

Chess Championship| जळगावात २ ते ८ ऑगस्ट 2025 दरम्यान राष्ट्रीय U‑11 बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा रंगणार आहे. ५००+ बालखेळाडू, ८ लाख रुपयांची बक्षिसं आणि लाईव्ह डिजिटल बोर्ड सामन्यांसह जळगावकरांसाठी मोठा उत्सव!

जळगाव दि. ०१ प्रतिनिधी – जळगाव जैन हिल्सच्या भव्य अनुभूती मंडपममध्ये ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा उद्या दि.२ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. स्वीग लीग मध्ये खेळविण्यात येणाऱ्या ११ वर्षाखालील मुलं-मुलींच्या या बुद्धिबळ महासंग्रामाची जय्यत तयारी झाली आहे. आठ मुलं व आठ मुलींच्या १६ लाईव्ह बुद्धिबळ पटांसह तब्बल २७५ टेबलांवर बुद्धिबळपटू आपल्या मोहरांच्या चाली खेळणार आहेत.

या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते उद्या २ रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. त्यांच्यासमवेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष तथा अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे व जैन स्पोर्टस अॅकडमीचे अध्यक्ष अतुल जैन, जळगाव बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव नंदलाल गादीया असतील.

राष्ट्रीय स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्याची संधी

पहिल्यांदाच भव्य स्वरूपात होत असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदिगड, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, पंजाब, राजस्थान राज्यातील ५५० च्यावर खेळाडू सहभागी झाले आहेत. यातील फिडे मानांकन प्राप्त ४०० खेळाडूंचा यात समावेश घेतला आहे. त्यात प्रथम मानांकित पुण्याचा अद्विक अग्रवाल (२२५१), मुलींमध्ये केरळची देवी बीजेस (१८६९) यांच्यासह अनेक खेळाडू हे आशियाई व जागतिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेले खेळाडू यात आहे. या राष्ट्रीय स्पर्धेद्वारा आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्याची संधी असल्याने स्पर्धेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

रेल्वेस्थानकाजवळ विशेष कक्ष..

जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मार्गदर्शनात होत असून जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड या आंतरराष्ट्रीय कंपनीने ही स्पर्धा प्रायोजित केली आहे. जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनतर्फे जळगाव रेल्वे स्थानकाजवळ खेळाडूंसाठी विशेष कक्ष उभारला असून असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे स्वागत केले व निवास व इतर व्यवस्थेबाबत त्यांना माहिती दिली.

आठ लाखांच्या पारितोषिकांसोबतच मुल्यांकनानुसार रोख बक्षिसे..

११ फेऱ्यांमध्ये २७५ बुद्धिबळ पटांवर भव्य स्वरूपात ही स्पर्धा रंगणार आहे. ११ वर्षांखालील मुलं-मुलींच्या ३८ व्या राष्ट्रीय स्पर्धेत ८ लाखाची बक्षिसे आहेत. वैयक्तीक स्वरुपाचे विजयी, पराजित व बरोबरीत असणाऱ्या सर्व खेळाडूंना रोख स्वरूपात विशेष पारितोषिके त्यांच्या खेळाच्या मुल्यांकनानुसार दिले जाणार आहेत. अशा प्रकारची बक्षिसे फक्त जळगावातून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या माध्यमातून दिली जातात.

Spread the love
Tags: #ChessChampionship#ChessIndia#JalgaonChess#JalgaonNews#MarathiNews#NationalChess#SportsNews#U11Chess
ADVERTISEMENT
Previous Post

ज्ञानज्योती Savitri Bai Phule Aadhar योजना 2025-26: अर्जासाठी 17 ऑगस्टपर्यंत मुदत; OBC, VJNT, SBC विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी

Next Post

माजी पंतप्रधानांचा नातू बलात्कार प्रकरणात दोषी, व्हिडिओ झाले होते व्हायरल!

Related Posts

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Next Post
माजी पंतप्रधानांचा नातू बलात्कार प्रकरणात दोषी, व्हिडिओ झाले होते व्हायरल!

माजी पंतप्रधानांचा नातू बलात्कार प्रकरणात दोषी, व्हिडिओ झाले होते व्हायरल!

ताज्या बातम्या

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us