Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील खेळाडूंच्या पालकांशी निशा जैन यांचा संवाद

दिल्लीचा अरिहत कपिल सातव्या फेरीपर्यंत अव्वल…

najarkaid by najarkaid
August 6, 2025
in जळगाव
0
राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील खेळाडूंच्या पालकांशी निशा जैन यांचा संवाद

राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील खेळाडूंच्या पालकांशी निशा जैन यांचा संवाद

ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. ६ प्रतिनिधी – जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरु असलेल्या ३८ राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा सातव्या फेरीपर्यंत अटितटीत आली आहे. दिल्लीचा अरिहत कपिल याने पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत सात पैकी सात सामने जिंकून मुलांमध्ये अव्वल स्थानावर आघाडी घेतली आहे. अरिहत कपिल ने महाराष्ट्राच्या अविरत चौहान याला धक्कादायक पद्धतीने नमविले. त्यामुळे त्याला एकल बढत घेता आली. दुसऱ्या पटावर तेलंगणाचा इशान कंदी व पश्चिम बंगालचा नरेंद्र अग्रवाल यांच्यात बरोबरीत सामना झाला. महाराष्ट्राच्या अद्वित अग्रवाल याने ओणीक्षूक मंडल यांच्यामध्ये बरोबरीत सामना झाला.

राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील खेळाडूंच्या पालकांशी निशा जैन यांचा संवाद
राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील खेळाडूंच्या पालकांशी निशा जैन यांचा संवाद

मुलींच्या गटात सहा गुणांसह सात खेळाडूंचे वर्चस्व…

३९२ मुलं व १७७ मुलींचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील मुलींच्या गटात पहिल्या बुद्धिबळ पटावर दिवी बिजेस आणि जानकी एस डी दोघं केरळ यांच्या अटितटीचा सामना होऊन बरोबरीत झाला. झारखंडची दिशीता डे हिने आरध्या दास त्रिपूरा हिच्यासोबतचा सामना बरोबरीत झाला. महाराष्ट्राची क्रिषा जैन व भूमिका बांधले यांच्यात तिसऱ्या पटावर सामना रंगला त्यात क्रिषा जैनने बाजी मारली. सुमिता पुनगावन तेलंगणा हिने मान्या ड्रोलिया गुजरात हिला नमवून आपले वर्चस्व कायम ठेवले. महाराष्ट्राची प्रिशा घोलप हिने कर्नाटकची नक्षत्रा गोमूदवेली  हिला नमविले. मुलींच्या गटात सहा गुणांसह सात खेळाडू आघाडीवर आहेत.

आजच्या सकाळच्या सत्रात अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन यांनी सांगितले की, तुम्ही विविध ठिकाणांवरुन येथे आला आहात. खेळताना विजय आणि पराभवाचा विचार करु नका. खेळाचा पुरेपुरे आनंद घ्या. फक्त खेळताना आपले शंभर टक्के योगदान द्या. असा खेळाडूंशी संवाद साधला. यानंतर पालकांशी व्यवस्थेविषयी चर्चा केली. राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेनिमित्त करण्यात आलेल्या व्यवस्थेविषयी पालकांनी समाधान व्यक्त करीत जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसराचे कौतूक केले. यानंतर पालकांनी अनुभूती स्कूल ला सुद्धा भेट दिली.

दुपारचे सत्र ऐश्वर्या रेड्डी यांच्या प्रमूख उपस्थितीत सुरू करण्यात आले, यावेळी बौद्धिक एकाग्रता वाढविण्यासाठी बुद्धिबळ खेळ खूप मोलाचा असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे मिडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, नाशिकचे वरिष्ठ प्रशिक्षक सुनील शर्मा, पंच दीपक चौहान, पुण्याच्या जुईली कुलकर्णी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

Next Post

जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us