Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस योगेश नन्नवरे यांची माहिती

najarkaid by najarkaid
December 12, 2025
in Uncategorized
0
सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,दि.१२ डिसेंबर २०२५- सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून राज्यातील १७ लाख कर्मचारी व शिक्षकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम, धंतोली येथे ९ डिसेंबरपासून सुरू केलेले बेमुदत साखळी उपोषण आज तिसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आले.

राज्य शासनाने आंदोलनाची गंभीर दखल घेत मुख्य सचिवांना संघटनांसोबत तातडीने चर्चा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज मुख्य सचिव मा. राजेश अग्रवाल यांनी समन्वय समितीच्या सुकाणू समितीसोबत सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत कर्मचारी-शिक्षकांच्या राष्ट्रीय सुधारित पेन्शन संदर्भातील कार्यपद्धती व नियम अधिसूचना तातडीने पारित करण्याची हमी शासनाने दिली. तसेच कर्मचारी–शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवांतर्गत प्रश्नांसाठी स्वतंत्र चर्चासत्राचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णयही चर्चेत निश्चित झाला.

संघटनेच्या उर्वरित १६ मागण्यांबाबत पुढील १५ दिवसांत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी संघटनांना मंत्रालयात बोलविले जाईल, असेही मुख्य सचिवांनी स्पष्ट केले. तसेच संघटनेने सुरु केलेल्या बेमुदत साखळी उपोषणाचा पुनर्विचार करावा, अशी विनंतीही त्यांनी या वेळी केली.

शासनाचा पुढाकार कर्मचारी-शिक्षकाभिमुख असल्याने समन्वय समितीने एकमुखी ठरावाने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले.

आजच्या चर्चेसाठी गेलेल्या शिष्टमंडळात विश्वास काटकर, अशोक दगडे, उमेशचंद्र चिलबुले, शिवाजी खांडेकर, भाऊसाहेब पठाण, संतोष पवार, सलीम पटेल, सुरेंद्र सरतापे, सुबोध किर्लोस्कर, गौतम कांबळे व गणेश देशमुख यांचा सहभाग होता.

ही माहिती जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष – मगन पाटील, सरचिटणीस – योगेश नन्नवरे, कार्याध्यक्ष – वासुदेव जगताप, कोषाध्यक्ष – घनःश्याम चौधरी, उपाध्यक्ष तथा राज्य संघटक – अमर परदेशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

Next Post

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us