Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

najarkaid by najarkaid
November 20, 2025
in Uncategorized
0
जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन
ADVERTISEMENT

Spread the love

फवारणी ड्रोन, कृषी यंत्र – अवजारे प्रमुख आकर्षण
 
जळगाव (प्रतिनिधी) – कृषी विस्ताराच्या कार्यात गेल्या 11 वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणार्‍या अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात नवतंत्रज्ञान, हायटेक फार्मिंग शेतमजुरीला पर्याय ठरतील, असे ड्रोन व लहान-मोठे शेती यंत्र व औजारांवर भर दिला आहे. या आधुनिक कृषी प्रदर्शनाचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.
     अ‍ॅग्रोवर्ल्डच्या या चार दिवसीय कृषी प्रदर्शनात 210 पेक्षा अधिक स्टॉल्स आहेत. शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशा लहान मोठ्या कृषी यंत्र व औजारांचे तब्बल 45 स्टॉल्स आहेत. बदलते हवामान, मजूर टंचाई, अद्ययावत तंत्रज्ञान, करार शेती, कमी पाण्यात येणारी पिके अशा शेतकर्‍यांची मागणी व गरजेवर आधारित मांडणी हे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे. अ‍ॅग्रोवर्ल्डचे जळगावतील यंदाचे हे 11 वे  प्रदर्शन आहे.
जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड, अँग्रिसर्च इं. प्रा.लि., मेट्रोजेन बायोटेक प्रा. लि या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषीतंत्र, निर्मल सिड्स, नमो बायोप्लांटस, सातपुडा अँटोमोबाईल्स, श्रीराम ठिबक, राईज एन शाईन बायोटेक प्रा लि, कृषिदूत बायो हर्बल, ओम गायत्री नर्सरी, युनिटी एनर्जी प्रा लि, पॅक युनिव्हर्स, महाविरा झेरॉन, फायटोट्रॉन, गोदावरी फाऊंडेशन हे सहप्रायोजक आहेत.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
शेतमजूर समस्येच्या पर्यायावर भर, विविध पिकांतील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, हाय व्हील्स चाकासह कृषी यंत्र व औजारांचे उपयुक्त स्टॉल्स, शेती बरोबरच परसबाग / टेरेस गार्डन साठीची रोप (नर्सरी ), फळे  व भाजीपसल्याच्या नर्सरी, सोलर फार्मिंग, झटका मशीन, फवारणसाठी ड्रोन, बँक, शासकीय विभाग व अनुदानाबाबत एकाच छताखाली माहिती उपलब्ध असेल. टिशूकल्चर केळीच्या कंपन्या, किचन गार्डन टूल्स, कमी पाण्यात, कमी श्रमात व हमीचे उत्पन्न देणारे अद्ययावत तंत्रज्ञान  सखोल मार्गदर्शन, कमी श्रमात – कमी पाण्यात मात्र शाश्वत उत्पादन देणार्‍या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स एकाच छताखाली असणार आहेत. प्रदर्शनस्थळी शेतीविषयक विविध पुस्तके देखील विक्रीसाठी उपलब्ध राहतील.
निर्मलतर्फे मोफत बियाणे
निर्मल सिडसतर्फे पहिल्याच दिवशी पहिल्या पाच हजार जणांना किचन गार्डन बियाणे पाकीट मोफत वितरित केले जाणार आहे. याव्यतिरिक्त रोज शंभरपेक्षाही अधिक जणांना लकी ड्रॉ द्वारे आकर्षक बक्षीसांसह सिका ई- मोटर्सतर्फे ई-स्कूटरचे बंपर बक्षीस जिंकण्याची संधी आहे. तरी शेतकर्‍यांनी या आधुनिक कृषी यंत्र व अवजारे प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

Next Post

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us