रावेर,(प्रतिनिधी)- खिर्डी खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानास फैजपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ अजित थोरबोले सह रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे मॅडम यांनी अचानक भेट देऊन प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत तांदुळाचे वाटप बाबत चौकशी करून कोणीही लाभार्थी धान्यापासून वंचित ठेऊ नये अश्या सूचना देऊन,प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना मोफत तांदूळ वाटप बाबत माहिती जाऊन घेऊन सोशलडिस्टन बाबत पाहणी केली.
यावेळी वाटपाचे नियोजन उत्कृष्ट नियोजन व शोषल डिस्टन साठी दुकानदार यांनी केलेली उपाययोजना आणि कोरोना व्हायरस चा प्रसार होऊ नये म्हणून दुकानाचे समोर विवीध प्रकारच्या मार्गदर्शन सूचना माहिती बाबत लावलेले फलक या कामगिरी बाबतप्रांताधिकारी यांनी दुकानदाराने केलेल्या कामाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे ,मंडळ अधिकारी मीना तडवी, खिर्डी तलाठी एफ. एस.खान,बलवाडी तलाठी निलेश पाटील, तांदलवाडी तलाठी रेखा जोरवार, कांडवेल तलाठी अतुल बडगुजर,शिंगाडी तलाठी एच. पी. जोशी, ग्रामविकास अधिकारी विजय महाजन,रावेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष गुणवंत पाटील, पोलीस पाटील प्रदीप पाटील,पत्रकार प्रवीण धुंदले,पत्रकार कांतीलाल गाढे, पत्रकार, सादिक पिंजारी,शेख इद्रिस भाई व सर्व पत्रकार मंडळी व गावातील ग्रामस्थ आदींसह उपस्थित होते.














