वडजी/भडगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणु पार्श्वभूमीमुळे संपूर्ण भारत लॉकडाऊन आहे.महिनाभरापासून शाळा बंद आहेत. शासनाने वार्षिक परीक्षा रद्द केल्या आहेत.विद्यार्थी पालक यांना शैक्षणीक मार्गदर्शन व्हावे यासाठी भडगाव कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे वडजी टी.आर.पाटील विद्यालयात इ.५वी ते १०वी चे विद्यार्थी व शिक्षक यांचे वर्ग व तुकडीनिहाय व्हाट्सऍप गृप तयार केले आहेत. वर्गशिक्षक व सर्व विषय शिक्षक प्रत्येक विषयाचे ग्रुप्सवर मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांना स्वाध्याय देत आहेत.सदर शैक्षणिक अभ्यास योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व पालकांनी देखील लक्ष घालावे असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.पाटील,बी.वाय.पाटील,एस.जे.पाटील सह सर्व वर्गशिक्षक,विषय शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर वृंद यांनी केले आहे. सदर उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील,गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशीसो,विस्ताराधिकारी विजय कुमावतसो,गणेश पाटीलसो,केंद्रप्रमुख संजय न्याहिदेसो,रविंद्र सोनवणेसो यांचे मार्गदर्शन लाभत आहे.