मुंबई – महाराष्ट्रात आजमितीस 868 रुग्ण असून 52 मृत्यू आहेत. मृत्यूदर देशात सर्वाधिक म्हणजे 5.99 इतका आहे. मरण पावलेल्या 11 रुग्णांमध्ये इतर कुठल्याही आजारांची लक्षणे नव्हती.
· एकूण 17563 सॅम्पल्स तपासले असून 15808 निगेटिव्ह आहेत.
· महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच पावले उचलल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.
· मुंबईमध्ये सर्वाधिक 525 रुग्ण असून 34 मृत्यू आहेत. त्या खालोखाल पुणे येथे 131 रुग्ण व 5 मृत्यू तसेच ठाणे विभागात 82 रुग्ण व 5 मृत्यू आहेत.
· महाराष्ट्रातील एकंदर 11 कोटी 19 लाख 66 हजार 637 लोकसंख्येपैकी 868 कोरोनाचे रुग्ण आढळले असून प्रत्येक 10 हजार लोकसंख्येमागे 0.077 असे रुग्ण आहेत.
· आढळलेल्या रुग्णांमध्ये 63 टक्के पुरुष आणि 37 टक्के महिला आहेत. मृत्यू पावलेल्यांमध्ये 39.75 टक्के पुरुष आणि 13.25 टक्के महिला आहेत.
· दहाव्या आठवड्यात भारतात 4125 रुग्ण आढळले. इतर देशांची दहाव्या आठवड्यातील तुलना केली तर अमेरिकेत 1 लाख 22 हजार 653, फान्समध्ये 37 हजार 145, जपानमध्ये 1 हजार 693 आणि चीनमध्ये 81 हजार 601 अशी आकडेवारी आहे.
· सध्या राज्यात 3 लाख 2 हजार 795 एन-95 मास्क, 41 हजार 400 पीपीई, 10 हजार 317 आयसोलेशन बेड, 2 हजार 666 आयसीयू बेड आणि 1 हजार 317 व्हेंटिलेटर्स आहेत