Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार सौ. सुरेखा महाले यांचा ‘सोशल डिस्टन्सिंग’चा अभिनव उपक्रम !

najarkaid by najarkaid
April 2, 2020
in जळगाव
0
पाचोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार सौ. सुरेखा महाले यांचा ‘सोशल डिस्टन्सिंग’चा अभिनव उपक्रम !
ADVERTISEMENT

Spread the love

  • कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पाचोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार सौ. सुरेखा महाले यांचा देशाला दिशादर्शक ठरणारा ‘सोशल डिस्टन्सिंग’चा अभिनव उपक्रम

जळगाव/पाचोरा – (प्रतिनिधी) दि. 2 – जगभर पसरत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. याचे फलीत म्हणून जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील देशमुखवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार सौ. सुरेखा संजय महाले यांनी धान्य वाटप करणेसाठी अभिनव कल्पना अंमलात आणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा अभिनव उपक्रम देशाला घालून दिला आहे.

सौ. सुरेखा महाले यांनी आपल्या दुकानात स्वस्त धान्य वाटप करण्यासाठी एक मोठे नरसाळे आणि स्वतंत्र पाईप ठेवले आहे. लाभार्थी दुकानात आल्यावर दुकानदार ई-पॅास मशिनद्वारे स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून लाभार्थ्यासमोर धान्य मोजतात. त्यानंतर लाभार्थ्यास पाईपच्या दुस-या टोकास पिशवी लावणेस सांगितले जाते. लाभार्थीनी पाईपच्या दुस-या टोकास पिशवी लावल्यानंतर त्या दुकानातून मोठ्या नरसाळ्यातून धान्य सोडतात. हे धान्य नरसाळ्यातून आपोआप लाभार्थीच्या पिशवीत पडते. यामुळे Social Distancing होत असुन लाभार्थ्यांना उभे राहण्यासाठी 5 फुट अंतरावर चौकोन तयार करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी रांगेत या चौकोनातच उभे राहण्याच्या सूचनाही त्या सर्वांना देतात. जळगाव जिल्ह्यात या अभिनव उपक्रमाचे स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.

देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्या प्रतिबंध करण्यसाठी केंद्र शासनाने देशभरात लॉकडाऊन जाहिर केला आहे. तसेच नागरीकांनी या कालावधीत सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्याही सुचना दिलेल्या आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वस्त धान्य दुकानदारांना स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून धान्य वाटपाची सुविधा ई-पॅास उपकरणावर उपलब्ध करून देण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पुरवठा विभागास धान्य वाटप करतांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सुचना दिल्यात. जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी या निर्णयाची जिल्हाभर काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना स्वस्त धान्य दुकानदार यांना दिल्या. त्यानुसार मीच माझा रक्षक माणून सौ. सुरेखा महाले यांनी आपली, आपल्या कुटूंबाची व ग्राहकांची सुरक्षितता ओळखून हा उपक्रम राबविण्याचा निश्चय केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत माहे एप्रिल 2020 चे धान्य वाटप सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सर्व 1934 स्वस्त धान्य दुकानदारांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना निर्गमित करणेत आल्या आहेत. धान्य वाटप करतांना Social Distancing चे पालन करावे, गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, लाभार्थ्यांमध्ये किमान 3 फूटाचे अंतर ठेवावे, दुकानदारांनी वाटप करतांना मास्कचा वापर करावा, तसेच धान्य् वाटप करतांना वारंवार आपले हात स्वच्छ धुवावेत आदि सूचना देणेत आल्या आहेत. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार या सूचनांचे पालन करत असुन काही दुकानदारांनी धान्य वाटप करणेसाठी अधिक खबरदारीचा उपाय योजल्याचे सौ. महाले यांच्या कल्पनेवरुन लक्षात येते.

श्रीमती महाले यांना ही कल्पना कशी सुचली याबाबत विचारले असता, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, तसेच तहसीलदार पाचोरा, पुरवठा अधिकारी आणि पुरवठा निरिक्षक, पाचोरा यांनी केलेल्या आवाहनानुसार मीच माझा रक्षक माणून लाभार्थ्यांना काही अंतर ठेऊन धान्य वाटप कसे करता येईल यावर विचार केला. काही दिवस पिठाची चक्की चालविली असल्याने यातूनच ही अभिनव कल्पना सुचल्याचे सौ. महाले यांनी सांगितले. या उपक्रमासाठी पत्रा, पाईप, एलबो, रिबीट आणि स्टॅंड यासाठी रू. 945/- तर मजुरीसाठी रूपये 700/- असा एकूण 1645/- रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. श्रीमती सुरेखा संजय महाले या पाचोरा शहरात गेल्या 20 वर्षापासुन स्वस्त धान्य दुकान चालवितात. त्यांचेकडे एकूण 470 लाभार्थी असुन हे लाभार्थी पण माझ्याच कुटूंबाचे घटक आहे. त्यांची सुरक्षितता ही माझी सुरक्षितता असल्याने मीच माझा रक्षक या उक्तीप्रमाणे ही कल्पना राबविल्याचेही सौ. महाले यांनी सांगितले. माझ्या या अभिनव उपक्रमाची जिल्हा प्रशासनाबरोबर शासनस्तरावरून अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी विशेष दखल घेतल्याने मी आनंदी आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील 14 शासकीय निवारागृहात राहताय 1352 स्थलांतरीत !

Next Post

आज पासून जैन ईरिगेशन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे अडीच हजार गरजू कुटुंबाना दोन वेळ स्नेहाची शिदोरी !

Related Posts

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Next Post
आज पासून जैन ईरिगेशन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे अडीच हजार गरजू कुटुंबाना दोन वेळ स्नेहाची शिदोरी !

आज पासून जैन ईरिगेशन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे अडीच हजार गरजू कुटुंबाना दोन वेळ स्नेहाची शिदोरी !

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us