जळगाव – मुंबई, पुणे, नागपूर, मधील व्यायाम शाळा, चित्रपट आणि नाट्यगृहे, जलतरण तलाव, शाळा, महाविद्यालये या महिना अखेरीपर्यंत बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार आता जळगाव जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगर पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक सरकारी, खाजगी शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये दि.३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे पत्र शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी काढले असून ते संबंधीत शाळा, महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे.