जळगाव परिमंडळ– महावितरणच्या जळगाव परिमंडळात आज दि. 12 मार्च, 2020 रोजी यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस अधिक्षक अभियंता (पायाभुत आराखडा) श्री. चंद्रशेखर मानकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं) श्री. नेमीलाल राठोड, कार्यकारी अभियंता (प्रशासन) श्री. नितीन पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक (मासं) श्री. रामचंद्र वैदकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. प्रविण बिसेन, कनिष्ठ विधी अधिकारी श्री. जिवन बोडके, उपव्यवस्थापक (मासं) श्री. सचिन ढोले यांच्यासह अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.