जळगाव- योग-निसर्गोपचाराच्या प्रचार व प्रसारार्थ व आजच्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या काळात विद्यार्थ्यांना अनेक शारीरिक व मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जीवघेणी स्पर्धा, परीक्षांचा अतिरिक्त ताण व अपेक्षित यश न मिळाल्यामुळे त्यांची ढासळणारी मानसिक स्थिती या सर्वांचा विचार करून मू.जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी तर्फे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ मनोबल या संस्थेमध्ये दि. ०४/०३/२०२० ते ११/०३/२०२० या कालावधीत ७ दिवसीय योग प्रकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे प्रशिक्षक एम.ए. योगशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी वैशाली भगवान सायखेडे व अर्चना रामभाऊ चौधरी ह्या होत्या या शिबिराअंतर्गत मनोबल या संस्थेमध्ये शिकत व कार्यरत असलेल्या विद्यार्थी व कर्मचार्यांना योग साधनेचे महत्व सांगून त्यांच्या आरोग्यासाठी व स्पर्धापरीक्षांमध्ये उपयुक्त ठरतील अशा महत्वाच्या टिप्स या शिबिराच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. मनोबल या
संस्थेमध्ये अंध/ अपंग विद्यार्थी अभ्यास करत आहे. त्यांना या शिबिराचा लाभ झाला. प्रकल्पाच्या समारोप प्रसंगी गीतांजली भंगाळे या उपस्थित होत्या. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. आरती गोरे, प्रा. देवानंद सोनार, योगेश सूर्यवंशी व दीपस्तंभ फौंडेशन यांनी सहकार्य केले.