भुसावळ :- तालुक्यातील वांजोळा येथील रहिवासी नरेंद्र डिगंबर पाटील यांनी आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत भरघोस विकासकामे गावात राबविल्याने त्यांना आमदार संजय सावकारे यांच्या कडून कार्य गौरव पत्र देवून गौरवण्यात आले.
वांजोळा व मिरगव्हाण गावात नरेंद्र पाटील यांनी रस्ते, गटारी, सामाजिक सभागृह, पाण्याची टाकी, समाज मंदिर, नदीवरील बंधारे, शेत शिवार बैठका, गावात हायमास्ट पोल,एलईडु स्ट्रेट लाईट, लोकसहभागातून श्रमदान करून पाणी आडवा पाणी जिरवा, ग्रामविकासाकरिता राबवलेले विविध उपक्रम,पेपर लेस डिजिटल ग्रामपंचायत , पेयजल योजना यासह अनेक महत्त्वपूर्ण योजना जिद्दीने व सचोटीने राबवल्या. या कार्याची दखल घेत आ.संजय सावकारे यांनी नरेंद्र डिगंबर पाटील यांना कार्य गौरव पत्र देवून गौरव केला.
या प्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, केसावर फुगे फेम दिग्दर्शक सचिन कुमावत,अभिनेते अण्णा सुरवाडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल पाटील,माजी सभापती राजेंद्र चौधरी,अँड. निर्मल दायमा,उद्योजक विनोद सोनवणे, जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.पंकज पाटील उपस्थित होते.