रावेर – श्रीराम मॅक्रो व्हिजन ॲकेडमी रावेर या सी बी एस ई इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील नर्सरी, ज्यू. केजी, सी. केजी च्या विद्यार्थ्यांची रावेर येथील न.पा. चे अग्नीशमन दल, स्वामी शॉपींग गॉल व छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र प्रदर्शन या स्थळांना क्षेत्रभेट उत्साहात संपन्न झाली.
क्षेत्रभेटीमुळे प्रत्येक्ष कृतीमधून शालेय मुलामुलींमध्ये वैश्विक मानवी मूल्ये, व सामाजिक बुध्दिमत्ता रूजवणे व त्यांचा विकास करून उत्तम नागरिक घडवणे हे क्षेत्रभेटीचे मुख्य उद्दिष्टे होते. तसेच नियोजन, नेतृत्वगुण विकास, जबाबदारपणा येतो. परिसराशी ओळख होते, दृष्टीकोन विकसित व्हायला मदत होते व क्षेत्रभेटीत निरिक्षणाला खूप महत्व असते.
प्रथम शालेय विद्यार्थ्यांनी स्वामी सुपर शॉप मॉल येथे भेट दिली. घरघुती संसार उपयोगी मुले घरात रोज पाहतात परंतु आपले पालक कोठून आणतात हे त्यांना प्रतयक्ष अनुभवायला मिळाले. मॉलच्या व्यवस्थापकांशी विद्यार्थ्यांन संवाद साधला. मॉल मधील मालाचे भाव, संगणकावर मालाची नोंद, मॉलमध्ये वस्तूची ठेवण्याची पध्दती हे सर्व पाहून विद्यार्थी आनंदी झाले तद्नंतर नगरपालिका रावेर येथील अग्नीशमन दलाला विद्यार्थ्यांनी भेट दिली. अग्नीशमन बद्दल सर्व माहिती विद्यार्थ्यांनी प्रश्नांच्या स्वरूपात विचारून शंकाचे समाधान केले. आगीवर नियंत्रण कसे केले जाते. सोबत कोण कोण असते. आग लागल्यावर तात्काळ गाडी निघते. पाण्याने गाडी नेहमी भरलेली असते. गाडीची रचना इ. प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले त्यांनतर विद्यार्थ्यांनी रावेर येथील मराठा मंगल कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रप्रदर्शन पाहिले त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे बालपणापासून ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत चित्रप्रदर्शन पाहिले. त्यात त्यांचे मावळे, जिंकलेले किल्ले, अफजलखानाचा वध, शाइस्तेखानाची फजीती, कोंढाणा किल्याची लढाई इ. चित्र पाहून विद्यार्थी आनंदून गेले.
क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन शाळेचे प्रशासक किरण दुबे, प्राचार्या सौ कविता शर्मा, व्यवस्थापक गजानन महाजन यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नर्सरी, ज्यू केजी, सी. केजी च्या शिक्षकांनी केले.










