Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाषा ही कमवावी लागते. माध्यमांमध्ये भाषा चांगल्या पद्धतीने जाणणा-यांची खूप गरज आहे-डॉ. आशुतोष पाटील

najarkaid live by najarkaid live
February 15, 2020
in जळगाव
0
भाषा ही कमवावी लागते. माध्यमांमध्ये भाषा चांगल्या पद्धतीने जाणणा-यांची खूप गरज आहे-डॉ. आशुतोष पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – भाषा ही कमवावी लागते. माध्यमांमध्ये भाषा चांगल्या पद्धतीने जाणणा-यांची खूप गरज आहे. चांगली भाषा बोलणे आणि चांगले लेखन करणे ज्याला येईल त्याला रेडिओ क्षेत्रात करिअरच्या वाटा खुल्या होतील. रेडिओ माहिती प्रसारणाचे उत्तम माध्यम आहे. ग्रामीण विकासात रेडिओने महत्वाची भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन भाषा प्रशाळा विभागातील मराठी विभागाचे डॉ. आशुतोष पाटील यांनी व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे दि.१४ व १५ फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिनानिमित्त “रेडीओ कार्यक्रम निर्मिती,वृत्तसंपादन आणि कौशल्य” याविषयावर द्विदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. समारोपावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कला व मानव्यविद्या प्रशाळाचे संचालक डॉ.अनिल चिकाटे होते. मंचावरऔरंगाबाद येथील माय एफ.एम. केंद्राचे आर.जे.अभय, विभागप्रमुख डॉ. सुधीर भटकर, कार्यशाळा समन्वयक डॉ. विनोद निताळे उपस्थित होते. कार्यशाळेचा आढावा घेताना डॉ. सुधीर भटकर यांनी, कार्यशाळेतील तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल आणि ते भविष्यात  प्रगती करतील अशी अशा व्यक्त केली.

   अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. चिकाटे यांनी, विद्यार्थ्यांना कार्यशाळा कौशल्यनिर्मिती आणि रोजगारासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी डॉ.सोमनाथ वडनेरे, डॉ.गोपी सोरडे, प्रा.विश्वजीत चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन तेजस शिंदे याने तर आभार गुलाब पाटील यांनी मानले.

दिवसभरातील मार्गदर्शन

कार्यशाळेच्या दुस-या दिवशी पहिल्या सत्रात जळगाव आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर बोबडे यांनी “रेडिओ कार्यक्रम निर्मिती : स्वरूप व प्रणाली ” याविषयी मार्गदर्शन केले. निर्मितीपूर्व, निर्मिती करताना आणि निर्मिती झाल्यावर करायची कार्यवाही यातील सविस्तर बाबी त्यांनी सांगितल्या. बातमी, शब्द, संगीत या तीन गोष्टींवर आकाशवाणीचे कार्यक्रम असतात. शिक्षण देणे, मनोरंजन करणे, माहिती देणे हे आकाशवाणीचे उद्दिष्ट असते. महिला, युवा, शेतकरी, जेष्ठ नागरिक अशा विविध घटकांना विविध विषयी मार्गदर्शन करून लोक जागृतीचे काम आकाशवाणी करते. कार्यक्रम निर्मितीत पुरेसा मजकूर गोळा करायला सकस वाचन, सामाजिक अभ्यास देखील तितकाच महत्वाचा असतो, असेही बोबडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. सूत्रसंचालन वसंती तडवी यांनी तर परिचय विनोद शेलोरे यांनी करून दिला.

  दुस-या सत्रात औरंगाबाद येथील माय एफ एम केंद्राचे आर.जे.अभय यांनी विद्यार्थ्यांना “रेडिओ जॉकी : स्वरूप व तंत्र” या विषयी मार्गदर्शन केले. श्रोत्यांचा मूड बघूनच आर जे ला बोलावे लागते. विविध क्षेत्रातील व्यक्तींचे, घटनांचे विविध किस्से तुम्हाला माहिती हवेत. तसेच गाणी वाजवताना प्रहरानुसार आणि वेळ पाहून गाणी वाजवावी लागतात. चांगल दिसण, बोलण, आणि उत्साह आर जे कडे असायला हवा. एखादी माहिती सांगताना श्रोत्यांना समजेल अशा भाषेत स्वारस्य निर्माण करीत सांगितले पाहिजे, असेही आर जे अभय याने विद्यार्थ्यांना समजून सांगितले.  सूत्रसंचालन मयूर पाटील  हिने तर परिचय चिन्मय जगताप यांनी करून दिला. कार्यशाळेचा दोन दिवसात जळगाव व धुळे येथील ८० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यशस्वीतेसाठी रंजना चौधरी, सुनील रडे, विष्णू कोळी यांचेसह विभागातील विद्यार्थी मयूर पाटील, वैशाली पाटील, मनिष मराठे, धनश्री राठोड, गुलाब पाटील, तेजस शिंदे, गणेश साळुंखे, वसंती तडवी, मन्जीला पाडवी, सुनील भोई, सुमित बोदडे, विनोद शेलोरे, भावना पचोरीया, चिन्मय जगताप, आदींनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री जिल्ह्यात मात्र शासकीय कर्मचारी कार्यालयातून गायब !

Next Post

जैन हिल्स शाश्वत शेतीचे मूर्तिमंत चित्र – मुख्यमंत्री ठाकरे

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जैन हिल्स शाश्वत शेतीचे मूर्तिमंत चित्र – मुख्यमंत्री ठाकरे

जैन हिल्स शाश्वत शेतीचे मूर्तिमंत चित्र - मुख्यमंत्री ठाकरे

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us