मुंबई – खनिज तेलाच्या किमतीत वाढ होत असली तरी तूर्त त्याची झळ भारतीयांना बसणार नाही. कारण पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमधील दर कपातीचा सपाटा शुक्रवारी कायम ठेवला. आज देशभरात पेट्रोल २१ पैसे तर डिझेल २४ पैशांनी स्वस्त झाले. गुरुवारी पेट्रोलमध्ये ८ ते १ ० पैसे आणि डिझेल १२ ते १३ पैशांची घसरण झाली होती. सातत्याने सुरु असलेल्या किंमतीतील घसरणीने इंधन दर तीन महिन्यांच्या नीचांकी स्तरावर खाली आले आहेत.
आजच्या दर कपातीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लीटर ७८.३४ रुपयांपर्यंत खाली आले आहे. तर डिझेल ६८.८४ रुपये झाले आहे. नवी दिल्लीत पेट्रोलसाठी ग्राहकांना ७२.६८ रुपये मोजावे लागत असून डिझेलचा दर ६५.६८ रुपये आहे. फेब्रुवारी महिन्यात मागील सात दिवसात पेट्रोल ५१ पैसे आणि डिझेल ५४ पैशांनी स्वस्त झाले आहे.
बंगळुरात पेट्रोलचा भाव ७५.१४ रुपये आणि डिझेलचा भाव ६७.९० रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोल दर ७५.५१ रुपये आणि डिझेल ६९.३७ रुपये आहे. गुडगावमध्ये पेट्रोल ७२.६६ रुपये असून डिझेल ६५ रुपये प्रति लीटर आहे. १२ जानेवारीपासून कंपन्यांकडून इंधन दरात कपात करण्यात येत असल्याने पेट्रोल ३ रुपये २६ पैसे आणि डिझेल ३ रुपये ४४ पैशांनी स्वस्त झाले आहे.