जळगाव | प्रतिनिधी -: जळगावकर रसिकांसाठी हास्याची अनोखी मेजवानी घेऊन लोकप्रिय मराठी नाटक ‘ऑल दि बेस्ट’ येत्या ७ जुलै २०२६ (मंगळवार) रोजी सायंकाळी ८ वाजता रंगणार आहे. हा प्रयोग छत्रपती संभाजी राजे नाट्य संकुल, जळगाव येथे आयोजित करण्यात आला असून, या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन देवेंद्र प्रेम यांनी केले आहे.

हास्यप्रधान कथानक, दमदार कलाकारांचा अभिनय आणि खळखळून हसवणारे संवाद यामुळे ‘ऑल दि बेस्ट’ हे नाटक प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरले आहे. जळगावातील नाट्यप्रेमींना दर्जेदार मनोरंजनाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री एंटरटेनमेंट यांनी केले असून, आयोजक विक्रमसिंग पाटील यांनी जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या हास्यसोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.
नाटकाच्या तिकिटांची ऑनलाइन बुकिंग BookMyShow वर सुरू असून, इच्छुक प्रेक्षकांनी आगाऊ तिकिटे आरक्षित करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आयोजकांशी 98920 30101 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच तिकीट बुकिंगसाठी एसडी इव्हेंट्स – 98506 03590 या क्रमांकावरही संपर्क साधता येणार आहे.
जळगाव शहरात पुन्हा एकदा रंगभूमीवरील हास्याचा जल्लोष अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार असून, कुटुंबासह आनंददायी संध्याकाळ घालवण्यासाठी हा प्रयोग नक्कीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.










