जळगाव – येथील जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याचा दि. १४ जानेवारी रोजी अंतिम दिवस आहे. उद्या माघारीनंतर निवडणुकीच्या रिंगणात अंतिम उमेदवार किती हे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा वकील संघाच्या निवडणूकीमध्ये आता अध्यक्षपदासाठी अॅड.दीपकराज खडके, अॅड.किशोर भारंबे, अॅड.दिलीप बोरसे तसेच उपाध्यक्ष पदांसाठी अॅड.प्रभाकर पाटील,अॅड.सुभाष तायडे हे रिंगणात आहेत. तर सचिव पदासाठी अॅड.नत्थू पाटील, अॅड.दर्शन देशमुख, सह सचिव पदांसाठी अॅड.चेतना कलाल, अॅड.स्मिता झालटे, अॅड.मंजुळा मुंदडा, अॅड.प्रतिभा पाटील, कोषाध्यक्ष पदांसाठी अॅड.संजय रुणवाल, अॅड.शरद न्हायदे, सदस्य पदांसाठी अॅड.समाधान पावसे, अॅड.वैशाली चौधरी, अॅड.भूषण सोनवणे,अॅड.नवलसिंग नाईकडा, अॅड.संजय खडके, अॅड.इस्माईल पटेल, अॅड.प्रवीण राक्षे, अॅड. नरेंद्र पाटील, अॅड.सचिन अग्रोया, अॅड.मिताली वाणी, अॅड.गणेश सावळे, अॅड. स्वप्नील निकम यांनी अर्ज दाखल केलेले आहेत.
मंगळवारी माघारीचा अंतिम दिवस असून त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी दुपारी ४ वाजेला प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अॅड.आर. एन. पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी अॅड.ए.आर.सरोदे, अॅड.शिरीन अमरेलीवाला यांनी दिली.