Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोणवाडी बु. ग्रामपंचायत : ग्रामसेवक व सरपंच मुख्यालयी गैरहजर; नागरिकांना शासकीय सेवा मिळण्यात अडथळा

नियमांचे उल्लंघन; प्रशासनाने तातडीने चौकशी करून योग्य कारवाई करण्याची ॲड.अरुण चव्हाण यांची मागणी

najarkaid live by najarkaid live
October 1, 2025
in Uncategorized
0
लोणवाडी बु. ग्रामपंचायत : ग्रामसेवक व सरपंच मुख्यालयी गैरहजर; नागरिकांना शासकीय सेवा मिळण्यात अडथळा

लोणवाडी बु. ग्रामपंचायत : ग्रामसेवक व सरपंच मुख्यालयी गैरहजर; नागरिकांना शासकीय सेवा मिळण्यात अडथळा

ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी):जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत लोणवाडी बु., ता. जि. जळगाव येथे ग्रामसेवक तसेच सरपंच मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्यामुळे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात मोठा अडथळा निर्माण होत असून यामुळे नागरिकांना वेळेवर शासकीय सेवा मिळत नसल्याची तक्रार ॲड.अरुण शिवाजी चव्हाण यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार अर्जाद्वारे दिनांक ३० सप्टेंबर रोजी केली आहे.

लोणवाडी बु. ग्रामपंचायत : ग्रामसेवक व सरपंच मुख्यालयी गैरहजर; नागरिकांना शासकीय सेवा मिळण्यात अडथळा
लोणवाडी बु. ग्रामपंचायत : ग्रामसेवक व सरपंच मुख्यालयी गैरहजर; नागरिकांना शासकीय सेवा मिळण्यात अडथळा

ॲड.अरुण चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की,  “ग्रामसेवक व सरपंच मुख्यालयी न राहिल्यामुळे ग्रामपंचायतीतील महत्वाचे कामकाज उशिरा होत आहे,यामुळे शासकीय कामकाज प्रभावित होत आहे.”

शासनाचे नियम पाळले जात नाहीत

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या परिपत्रक क्रमांक पंरास 2018/प्र.क्र.488/आस्था-7, दिनांक 9 सप्टेंबर 2019 नुसार ग्रामीण भागातील शासकीय कर्मचार्‍यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक आहे, विशेषतः ग्रामसेवकांसाठी. तथापि, सदर नियमांचे पालन होत नसल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या वाचा….

लोणवाडी ग्रामपंचायत…

ग्रामसेवकाकडून माहिती अधिकार कायद्याला ‘फाटा’

माहिती दडवल्याने संशयाला ‘वाटा’

शासकीय कर्मचाऱ्यांचा मुख्यालयी वास्तव्यास न राहणे ही सार्वजनिक सेवेत बाधा आणण्याची बाब मानली जाते. प्रशासन नियम 2019 नुसार आवश्यक ती चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्यास बाध्य आहे. या प्रकारे कारवाई केल्याने ग्रामस्थांच्या हितासाठी शासकीय कामकाज सुरळीत राहू शकते.

ग्रामस्थांनी यामुळे नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

लोणवाडी ग्रामपंचायत : ‘त्या’ ठरावावर ७ सदस्यांचा आक्षेप, सरपंच-ग्रामसेवक अडचणीत?

PM आवास योजनेतून लाभार्थ्यांची नावे वगळल्याचे प्रकरण ; सरपंच, ग्रामसेवकांविरोधात थेट ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार

https://najarkaid.com/latest-marathi-news/

कायदा काय आहे

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या परिपत्रक क्रमांक पंरास 2018/प्र.क्र.488/आस्था-7, दिनांक 9 सप्टेंबर 2019 नुसार ग्रामसेवकांना मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न केल्यास ग्रामपंचायतच्या दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होतात आणि प्रशासन नियमांचे उल्लंघन मानते.

लोणवाडी ग्रामपंचायत ; घरकुल यादीतून लाभार्थ्यांचे नाव वगळले, प्रोसिडींग बुक मध्ये खाडाखोड

सरपंच, ग्रामसेवका विरुद्ध पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

👇🏻
https://najarkaid.com/gramsevak-tharav-sanshay-grampanchayat/

सरपंचसंबंधी कायद्याने थेट मुख्यालयी वास्तव्यास बंधनकारक ठरवलेले नाही, तरी प्रशासन व मार्गदर्शक तत्त्वांनुसार सरपंचाने ग्रामपंचायत कार्यालयात नियमित उपस्थित राहणे अपेक्षित आहे. गैरहजेरीमुळे स्थानिक कामकाजात उशीर होणे व नागरिकांना शासकीय सेवा मिळण्यात अडचणी येणे प्रशासनासाठी गंभीर समस्या ठरते.

याप्रकारे ग्रामसेवक व सरपंच यांच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थांच्या हितास धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाला तातडीने चौकशी करून योग्य शिस्तभंगाची कारवाई करणे गरजेचे आहे.

लोणवाडी ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक यांनी आधीच घरकुल योजनेतून पात्र लाभार्थ्यांची नावे वगळल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य व लाभार्थ्यांकडून करण्यात आला होता. या प्रकरणात सात सदस्यांनी थेट आक्षेप घेत सरपंच व ग्रामसेवकांनी परस्पर ठराव केल्याची तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे केली असून ठराव रद्द करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. या वादानंतर माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत मागवलेली माहितीही ग्रामसेवकाने न देत दडपून ठेवल्याचे समोर आले होते. त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक अडचणीत येण्याची शक्यता वाढली असून ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या पारदर्शकतेबाबत गंभीर संशय निर्माण झाला आहे दरम्यान ग्रामसेवक व सरपंच मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार  ॲड.अरुण शिवाजी चव्हाण यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे  केली असून प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Spread the love
Tags: #AdministrativeDelay#CitizenRights#Gramsevak#jalgaon#LocalGovernance#MaharashtraPanchayat#PanchayatIssues#PublicService#Sarpanch#VillageAdministration
ADVERTISEMENT
Previous Post

महिलांनो, ‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत eKYC प्रक्रिया त्वरित पूर्ण करा, अन्यथा पैसे येणे होईल बंद!”

Next Post

Bank Job Recruitment 2025: बँकेत अधिकारी पदांसाठी भरती जाहीर

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Next Post
Bank Job Recruitment 2025: बँकेत अधिकारी पदांसाठी भरती जाहीर

Bank Job Recruitment 2025: बँकेत अधिकारी पदांसाठी भरती जाहीर

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us