Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोणवाडी ग्रामपंचायत : ‘त्या’ ठरावावर ७ सदस्यांचा आक्षेप, सरपंच-ग्रामसेवक अडचणीत?

PM आवास योजनेतून लाभार्थ्यांची नावे वगळल्याचे प्रकरण ; सरपंच, ग्रामसेवकांविरोधात थेट ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार

najarkaid by najarkaid
September 5, 2025
in Uncategorized
0
लोणवाडी ग्रामपंचायत : ‘त्या’ ठरावावर ७ सदस्यांचा आक्षेप, सरपंच-ग्रामसेवक अडचणीत?
ADVERTISEMENT

Spread the love

लोणवाडी, ता. जळगाव (प्रतिनिधी): लोणवाडी ग्रामपंचायतीतील घरकुल यादीतून पात्र लाभार्थ्याचे नाव वगळल्याच्या प्रकरणात अजून धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून ‘त्या’ ठरावावर ७ सदस्यांनी थेट आक्षेप घेत सरपंच-ग्रामसेवक यांनी परस्पर ठराव केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी, पंचायत समिती जळगाव यांना तक्रार दिली असून ‘तो’ रद्द करून सरपंच ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यामुळे सरपंच, ग्रामसेवक अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे.

दरम्यान ग्रामपंचायत सदस्य संदीप भास्कर पवार,साईदास राठोड,व इतर सदस्य यांच्याशी ‘नजरकैद’ प्रतिनिधी यांनी मोबाईलवर संपर्क साधून या तक्रारी बाबत विचारणा केली असता होय आम्हीच तक्रार केली असून लोणवाडी येथील कमलाबाई शिवाजी चव्हाण यांचे नाव पंतप्रधान आवास योजना (PMAY) योजनेच्या लाभार्थी यादीतून नाव वगळण्यासाठी करण्यात आलेला ठराव आम्हाला विश्वासात न घेता परस्पर करण्यात आलेला आहे. तरी सदर ठराव सरपंच आणि ग्रामसेवक यांनी परस्पर केला अशी माहिती त्यांनी दिली आहे. सदर प्रकरणाने आधीच खळबळ उडाली असतांना या प्रकरणात ग्रामपंचायत सदस्यांनी नवा खुलासा केल्याने प्रकरणाने नवं वळण घेतलं असून गटविकास अधिकारी काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नेमकं काय आहे प्रकरण

लोणवाडी येथील कमलाबाई शिवाजी चव्हाण यांचे नाव पंतप्रधान आवास योजना (PMAY) अंतर्गत ऑफलाईन यादीत क्रमांक ४१ वर होते. मात्र ऑनलाईन यादीत त्यांचे नाव अचानक गायब झाले. यासंदर्भात ग्रामसेवकांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नाव जाणूनबुजून वगळले असल्याचा संशय लाभार्थ्यांच्या मुलगा अॅड. अरुण चव्हाण यांनी व्यक्त केला.

माहिती अधिकारात माहिती उघड ; ठरावात खाडाखोड?

अॅड. अरुण चव्हाण यांनी माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत पंचायत समितीकडून माहिती मागवली असता धक्कादायक बाब समोर आली. जानेवारी महिन्यातील ठराव क्रमांक 8/1 मध्ये 30 नावे घरकुल यादीतून वगळल्याचे नमूद होते. मात्र, अनुक्रमांक 31 आणि 32 अशी दोन नावे नंतर लहान अक्षरात वाढवण्यात आली होती. परिणामी कमलाबाई चव्हाण यांचे नाव गायब झाले, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

लोणवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच व इतर सदस्यांना विश्वासात न घेता, सरपंच आणि ग्रामसेवकांनीच ठराव केल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी, पंचायत समिती, जळगाव यांच्याकडे  दिनांक ४ सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून त्यावर ७ सदस्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे ग्रामसेवक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तक्रार अर्जावर या सदस्यांच्या सह्या

1) साईदास राठोड
2)संदीप भास्कर पवार
3)मंगला रमेश पाटिल
4)श्रावण सदू राठोड
5)वैताबाई रोहिदास चव्हाण
6)आशाबाई रमेश ठाकरे
7)गीता बाळू धाडी

पोलिस अधीक्षकांकडे थेट तक्रार

या संपूर्ण प्रकरणात सरकारी दस्तऐवजांमध्ये खाडाखोड केल्याचा आरोप करत अॅड. अरुण चव्हाण यांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. यात ग्रामसेवक रघुनाथ चव्हाण, सरपंच अनिता बळीराम धाडी आणि त्यांचे पती बळीराम धाडी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पैशांची मागणी व धमकीचा आरोप

कमलाबाई चव्हाण यांनी सन 2005 पासून शासकीय जागेत वास्तव्य केले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत अर्ज करताना त्यांचे नाव पात्रतेनुसार समाविष्ट झाले होते. मात्र, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी पैसे मागितले, अन्यथा घरकुल मिळणार नाही, अशी धमकी दिल्याचेही पत्रात नमूद आहे.

पावसाळ्यात धोक्यात कच्चे घर

सध्या पावसाळा सुरू असून, कमलाबाई चव्हाण यांचे मातीचे घर धोक्यात आहे. त्यामुळे त्यांचा जीव आणि मालमत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी अरुण चव्हाण यांनी केली आहे.

Latest news :

NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?

कार खरेदीचा विचार करताय ? नवीन GST दर लागू: Maruti Alto पासून Mahindra Thar पर्यंत जाणून घ्या संपूर्ण यादी!

तुमचा क्रेडिट स्कोर लो आहे का? पर्सनल लोन मिळवण्यासाठी या 6 ट्रिक्स ठरतील उपयोगी!

SIP मध्ये होणाऱ्या गुंतवणूक करतांना या ५ चुका टाळा,अन्यथा…

US Visa Interview Waiver बंद : भारतीय विदयार्थ्यांवर थेट परिणाम,अमेरिकेने घेतला मोठा निर्णय!

महत्वाचे :- Mutual Fund विक्रीचे नियम: चुकीच्या Exit ने कसा होतो तोटा?

महत्वाचे :-  Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

महत्वाचे :-   Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

महत्वाचे :- पर्सनल लोन घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स

हे पण वाचा :-  Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा

हे पण वाचा :-  Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर

हे पण वाचा :- टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज!

Spread the love
Tags: #BreakingNewsMarathi#Latestmarathinews#MaharashtraNews#MarathiHeadline#MarathiLiveNews#MarathiUpdates#TrendingMarathi#आजच्याबातम्या#ताज्याबातम्या#मराठीबातम्या
ADVERTISEMENT
Previous Post

Sex Racket ; अभिनेत्रीने ‘हिरोईन बनवू’ म्हणून तरुणींना वेश्या व्यवसायात ढकललं ; ठाण्यात मोठा पर्दाफाश!

Next Post

Personal Finance : चिंता सोडा! CIBIL स्कोअर नसतांना मिळेल कर्ज, केंद्र सरकार कडून मोठा खुलासा

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
Personal Finance : चिंता सोडा! CIBIL स्कोअर नसतांना मिळेल कर्ज, केंद्र सरकार कडून मोठा खुलासा

Personal Finance : चिंता सोडा! CIBIL स्कोअर नसतांना मिळेल कर्ज, केंद्र सरकार कडून मोठा खुलासा

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us