लोणवाडी, ता. जळगाव (प्रतिनिधी) :जळगाव जिल्ह्यातील लोणवाडी गावातील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे नाव वगळल्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली झालेल्या अन्यविरुद्ध व ग्रामपंचायतच्या सरकारी कागदपत्रामध्ये खाडाखोड केल्याप्रकरणी लाभार्थीच्या मुलाने सरपंच, ग्रामसेवक व सरपंच पती विरुद्ध थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, जळगाव तालुक्यातील लोणवाडी गावात पंतप्रधान आवास योजना अंतर्गत
कमलाबाई शिवाजी चव्हाण (बेलदार) यांचे नाव ऑफलाईन यादीत ‘ड’ यादीत ४१ क्रमांकावर असताना ऑनलाईन यादीत अचानक गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दरम्यान या बाबत ग्रामसेवक यांना अर्जदार यांनी विचारणा केल्यानंतर नाव कसे गायब झाले याबाबत समाधानकारक माहिती देऊ न शकल्याने जाणीवपूर्वक नाव वगळल्याचा संशय लाभार्थी कुटुंबाला निर्माण झाला होता.
यानंतर लाभार्थी यांचा मुलगा अॅड. अरूण शिवाजी चव्हाण यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, जळगाव कार्यालयाकडे तक्रार व माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अर्ज करून माहिती मागितली होती त्यानुसार अरुण चव्हाण यांना माहिती प्राप्त झाली असता ग्रामपंचायतीतील ठरावमध्ये खाडाखोड व संशयास्पद नावे कमी केल्याचे दिसून आले आहे.
लाभार्थ्यांच्या मुलगा अरुण चव्हाण यांनी पंचायत समिती, जळगाव कार्यालयाकडून माहिती मागितली असता ग्रामपंचायतीचा जानेवारी महिन्यातील ठराव क्र. 8/1 मध्ये स्पष्टपणे 30 नावे घरकुल यादीतून वगळण्यात आल्याचे दिसते मात्र, अनुक्रमांक 31 व 32 लहान अक्षरात दोन नावे वाढवण्यात आले, ज्यामुळे नामनिर्दिष्ट लाभार्थ्याचे नाव गायब झाले.मात्र ऐकून वगळलेली संख्या 30 नमूद आहे. यामुळे 31 आणि 32 नंबर असलेली दोन नंतर वाढवण्यात आली असा गंभीर आरोप व तक्रार अरुण चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान अरुण चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीमुळे सरकारी दस्तऐवजांमध्ये खाडाखोड उघडकीस आला आहे. लाभार्थ्यांच्या मुलाने थेट पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार केली असून ग्रामसेवक रघुनाथ चव्हाण, सरपंच अनिता बळीराम धाडी व त्यांचा पती बळीराम तुकाराम धाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या कागदपत्रावरून दिसून येते की, ग्रामपंचायतीच्या प्रोसिडिंग बुकमध्ये ठराव मध्ये नंतर फेरफार करण्यात आल्याचा गंभीर संशय निर्माण होतो. ठरावाच्या मजकुरात काही नावे जाणीवपूर्वक वगळून पात्र लाभार्थ्यांवर अन्याय करण्यात आल्याचे दिसते. या ठरावात कुठे तरी खाडाखोड, तर कुठे तरी नावं घातली किंवा वगळली गेली असल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. म्हणूनच या ठरावामुळे ग्रामसेवक, सरपंच व सरपंच पतीवर लाभार्थ्यांकडून अविश्वास आणि संशय बळावत आहे.
ग्रामसेवकावर संशयाची सुई
या संपूर्ण प्रकरणामध्ये ग्रामसेवकाची भूमिका सर्वाधिक संशयास्पद मानली जात आहे. कारण, प्रोसिडिंग बुकमध्ये पात्र लाभार्थ्यांची नावे वगळण्याच्या आरोप आहे. ग्रामपंचायतीतील सर्व कागदपत्रांवर ग्रामसेवकाची सही आणि जबाबदारी निश्चित असल्याने या कारभारात त्याने डोळेझाक केली का, की थेट संगनमत केले, असा प्रश्न उपस्थित उपस्थित होतं आहे. गावातील घरकुल योजनेत पारदर्शकतेऐवजी पक्षपात होत असल्याच्या आरोपांची सरळसरळ दिशा ग्रामसेवकाकडे वळताना दिसते.
घरकुलासाठी अर्ज आणि अन्याय
कमलाबाई चव्हाण यांनी सन 2005 पासून लोणवाडी शासकीय जागेत राहत असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला होता. ऑफलाईन सर्वे यादीत त्यांचे नाव अनुक्रमांक 41 वर असल्यामुळे त्यांना घरकुलाचा लाभ मिळण्यास पात्र ठरले असतांना ग्रामसेवक व सरपंच यांनी घरकुल मंजुरीसाठी पैसे मागितले व न दिल्यास घरकुल मिळणार नाही अशी धमकी दिल्याचे तक्रार अर्जात नमूद आहे.
प्रशासनाकडे तक्रार : कारवाईची अपेक्षा
पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने लाभार्थ्यांचे मातीचे घर धोक्यात आहे. या घटनेमुळे योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तरी तात्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी अरुण चव्हाण यांनी केली आहे.
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी