Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य बालनाट्य स्पर्धेचा पहिला दिवस

najarkaid live by najarkaid live
January 6, 2020
in जळगाव
0
राज्य बालनाट्य स्पर्धेचा पहिला दिवस
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – बालकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून उद्याचा प्रगल्भ कलावंत घडावा म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या 17 व्या राज्य बालनाट्य स्पर्धेला आजपासून छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सादर झालेल्या बालनाट्यातील नाविन्यपूर्ण विषयांवर विद्यार्थी कलावंतांनी सादर केलेल्या अभिनयाने पहिला दिवस रंगला.
आज (दि.6) सकाळी 9.30 वाजता स्पर्धेचे उद्घाटन जळगावात पहिले बालनाट्य सादर करुन बालरंगभूमीच्या चळवळीस सुरुवात करणारे ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, नाट्य परिनिरीक्षण मंडळ सदस्या प्रा.डॉ.शमा सराफ, स्पर्धेचे परीक्षक प्रा.डॉ.दिलीप अलोणे (वणी, यवतमाळ), युवराज अवसरमल (मुंबई), राजीव चुरी (मुंबई) हे उपस्थित होते. दीपप्रज्वलन व नटराजपूजनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक केंद्र समन्वयक सरिता खाचणे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.श्रध्दा पाटील यांनी केले.
म्याव म्याव निरंजन (अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव)
मांजरांच्या सोसायटीमध्ये नवीन वर्षानिमित्त होणार्‍या एका कार्यक्रमाची तयारी सुरु असते आणि या तयारीला जात असलेल्या मांजरांना काही माणसं आडवी जातात. मांजरांच्या दुनियेत हा फार मोठा अपशकून मानला जात असल्यामुळे त्यांच्या सोसायटीमध्ये एकच गहजब उडतो. याचा फायदा घुंगरुबाबा नावाचा एक भोंदू बाबा आणि त्याचे साथीदार घेतात. मांजरांना वेगवेगळे उपाय सागून त्यांच्याकडून पैसे उकळतात. आजच्या या यंत्रयुगातही शकुन अपशकुन मांडणार्‍या माणसाच्या प्रवृत्तीवर भाष्य करणार्‍या या बालनाट्यातून राज पाटील, मुकुंद चौधरी, निखिल कळसकर, प्रथमेश सोनवणे, निकिता बारी, नंदिनी शिंदे, आकांक्षा पारध, कृष्णा महाले, तुषार चौधरी, नमनसिंग पाटील, प्रणव जाधव, रुपेश शिंदे, रुद्राक्ष माळी, तेजस चौधरी, अंश भावसार, रोहित बागुल, तन्वी काटकर, शर्वरी वाडकर, धीरज घुगे, कल्पना जोशी, गौरव भदाणे यांनी मांजराच्या तर ओम पाटील व गोपाल राजपूत यांनी बोक्याच्या भूमिका केल्या होत्या. पवन खोंडे (घुंगरु बाबा), उमेश झुरके, ओजस्विनी बोरसे, वैष्णवी शिंदे, मोहित सोनवणे (साथीदार), प्रतीक सपकाळे (टिल्लू शेठ), रितेश काविरे (मन्या मामा), नंदिनी शिंपी (म्हातारी आजी) यांनी भूमिका केल्या होत्या. या बालनाट्याचे लिखाण नितीन वाघ तर दिग्दर्शन रश्मी लाहोटी यांनी केले होते. तांत्रिक बाजूत पूर्वा पाटील (पार्श्‍वसंगीत), रोहित बोरसे (ढोलकी), योगेश पाटील (प्रकाशयोजना), अरविंद बडगुजर (नेपथ्य), ज्ञानेश्‍वर सोनवणे (रंग व वेशभूषा) यांनी सांभाळली होती. जितेंद्र पाटील, उत्कर्ष नेरकर, दिपक महाजन यांची रंगमंच व्यवस्था होती.
बुडबुडे (विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव)
ज्या काळात मोबाईल अगदीच नवीन होते आणि अनेकांना मोबाईलदेखील माहिती नव्हते त्या काळातील मोबाईलचे अर्पूप सांगणारे बालनाट्य म्हणजे बुडबुडे. एका स्पर्धेत सनीला मोबाईल बक्षीस म्हणून मिळतो पण तो केवळ आपला आहे या जाणिवेतून तो अनेकांची मने दुखावतो. अचानक पडलेल्या पावसात झाडाखाली उभा असताना सनीचा मोबाईल झाडाची फांदी पडून तुटतो. मोबाईल मिळाल्याचा आनंद हा पाण्याच्या बुडबुड्यासारखा क्षणिक ठरतो. क्षणिक आनंदातच सौख्य मानणार्‍या माणसाच्या वृत्तीवर भाष्य करणार्‍या या बालनाट्याचे लेखन नितीन वाघ यांनी तर दिग्दर्शन अनुराधा धायबर यांनी केले होते. या बालनाट्यात दिविज जोशी (कीर्तनकार), आदिती सैंदाणे (आई), अर्जुन फाळके (बापू), अर्जुन सोनार (सनी), प्रणव भागवते (हनी), मानसी असोदेकर (लाडी), अनुज जोग (गोंद्यामास्तर), कुश अंबुसकर (शिक्षक), प्रिया माखीजा (बाई), तनुश्री पाटील (मुलगी), अन्वेषा शर्मा (शिक्षिका), लव अंबुसकर, दिशा गहलोत (गावकरी), ज्ञानदीप कलाल व दीपक चौधरी, हिमांशू गहलोत (रेसर), जयेश सपकाळे (स्टंटमॅन), मानसी बडगुजर व नैना कोळी (विद्यार्थींनी), आर्यन सुरवाडे (माणूस) या बालकलावंतांनी भूमिका केल्या होत्या. तांत्रिक बाजूत कविता सूर्यवंशी (रंगभूषा), उत्कर्ष नेरकर (पार्श्‍वसंगीत), दत्तात्रय गंधे (नेपथ्य), सचिन मावळे, अनिल कोळी (प्रकाशयोजना) यांनी सांभाळली होती.
पोंगा पंडित (श्री छत्रपती शिवाजी क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, शेंदुर्णी)
एका राज्यात दंगल घडते, लोक या दंगलीबाबत राजाकडे तक्रार करतात. यावेळेस चौकशीदरम्यान बमचिक बाबा जबाबदार असल्याचे समजते. त्याने आपल्या प्रवचनातून समाजाबद्दल अपशब्द वापरल्याने दंगल घडली हा आरोप त्याच्यावर लावण्यात येतो. पण बमचिक बाबा यासाठी आमदार झाल्टे यांना जबाबदार ठरवतो. अखेरीस या दंगलीसाठी शाहीर व इतर कलाकार जबाबदार आहेत, असा निर्णय राजा घेतो. एखाद्या राज्यात कलाकार असतांना दंगल घडूच कशी शकते असा सवाल राजा करतो. समाजात शांतता व सलोखा राखण्याची जबाबदारी ही कलावंतांची आहे, असा संदेश देणारे हे बालनाट्याचे लेखन नितीन वाघ तर दिग्दर्शन श्रीकृष्ण चौधरी यांनी केले होते. या बालनाट्यात प्रशांत चौधरी (शिपाई), वेदांत विसपुते (राजा), ऋषिकेश कुमावत (बमचिक बाबा), मोहिनी चौधरी, आकांक्षा गवळी, स्नेहल गुजर (गवळणी), रोहन बारी (मावशी), मनिष गुजर (कृष्ण), समर्थ गुजर (पेंद्या), अमेय गुजर (आ.झाल्टे), करण परदेशी (कार्यकर्ता), संपदा कुलकर्णी (पी.ए.), समर्थ गुजर, तनुश्री लोंढे (पोलीस), रोशन धनगर (बॉडीगार्ड), धृपसिंग परदेशी, नेहा गुजर, विधी जहागीरदार (शिष्य), सचिन तडवी (गावकरी), हर्षल गुजर (इसम) या बालकलावंतांनी अभिनय केला होता. तांत्रिक बाजू सचिन जगताप (नेपथ्य), दिनेश विसपुते (प्रकाशयोजना), भावराव निकम, हरिश्‍चंद्र तावडे (संगीत), स्नेहल विसपुते (रंगभूषा), समाधान निकम, सागर निकम (नृत्य), छाया गुजर (वेशभूषा) यांनी सांभाळल्या होत्या.
एक बनो – नेक बनो (तात्यासाहेब सामंत माध्य.विद्यालय, चाळीसगाव)
विलासपूर गावातील धीरज हा आईविना मुलगा सावत्र आईच्या जाचाने कंटाळलेला असतो. एकदिवशी वडील रागावल्याने तो घर सोडून निघून जातो. दुसर्‍या गावात असताना राजपुत्राच्या घोड्याखाली येणार्‍या रांगत्या मुलाला वाचवतो पण राजपुत्राच्या घोड्यासमोर आला म्हणून त्याला पंधरा फटक्यांची शिक्षा मिळते. धीरज गावातील मुलांना घेवून या अन्यायाविरुध्द लढण्यासाठी वानरसेना स्थापतो. या वानरसेनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक व्यापारांचा काळाबाजार उघडकीस आणतो. राजपुत्राचा घोडा बिथरल्यावर वानरसेना राजपुत्राचे प्राण वाचवतात. राजाने हवे ते बक्षीस माग असे सांगितल्यावर धीरज गावाची पाणीटंचाई दूर होण्यासाठी श्रमदानातून गावासाठी तलाब बांधण्याची परवानगी मागतो. एकीचा संदेश देणार्‍या या बालनाट्यात वेदिका चव्हाण (स्त्री), श्रेयस वाघ (धीरज), भावेश पाटील (राजपूत्र), यश चौधरी (राजा), अर्णव वाघ (प्रधान), विवेक टकले (सेनापती), भावेश गोसावी (कोतवाल), ओजस सोनवणे (माखनशेठ), शशांक पाटील, शुभम देशमुख, धीरज पाटील (मुलं), चेतन सोनवणे, सुमित देवरे (शिपाई) या बालकलावंतांनी भूमिका केल्यात. लेखन रत्नाकर रानडे यांचे तर विवेक देशपांडे यांचे दिग्दर्शन होते. तांत्रिक बाजू रविंद्र देशपांडे (प्रकाशयोजना), अमोल येवले (नेपथ्य), मनिषा कोळी (रंगभूषा) यांनी सांभाळल्यात.
ओम मर्कटाय नमः (स्वामी विवेकानंद पतसंस्था, कळमसरा)
मदारी गावातील एका चौकात आपल्या माकडांचा खेळ करत असतो पण लोकांना खेळ न आवडल्याने, त्याला पैसे मिळत नाही. अनेक प्रयत्नांनंतरही पैसे न मिळाल्याने जमुरा त्याला हा खेळ सोडण्याबद्दल सांगतो. पण समाजाची परंपरा सोडता येत नाही म्हणून मदारी त्याला नकार देतो व खेळच बदलवतो. मारामार्‍या, भांडण, खून यांचा समावेश असलेला खेळ सुरु करतो. हा खेळ लोकांना खूप आवडतो व त्याला भरपूर पैसे मिळतात. त्यामुळे यापुढे हाच हिंसक खेळ दाखविण्याचा ते निर्णय घेतात. पण त्याचवेळेस तिथे राष्ट्रपिता महात्मा गांधी येतात व बुरा मत सुनो, बुरा मत कहो, बुरा मत देखो हे माकडांच्या माध्यमातून समजावून सांगतात. या बालनाट्याचे लेखन नितीन वाघ व दिग्दर्शन नरेश पाटील यांनी केले होते. बालनाट्यात मोहित चौधरी (जमुरा), वेदांत पाटील (मदारी), सुमित शिंदे, लोचना चौधरी, विपुल गुजर (माकड), विवेक तडवी, अनुराज महानोर, लोकेश लोहार, गौरव चौधरी, चैतन्य जोहरे, अक्षय सूर्यवंशी, विपुल गुजर,  प्रियंका बारी, मीता गुजर, अक्षय गुजर, अथर्व कुलकर्णी, मनिष जोहरे, पार्थ पाटील, लोकेश चौधरी (गावकरी) तर गौरव बारी याने महात्मा गांधी यांची भूमिका केली होती. तांत्रिक बाजू सचिन जगताप (नेपथ्य), दिनेश विसपुते (प्रकाशयोजना), भावराव निकम, हरीश्‍चंद्र तावडे (संगीत), समाधान निकम, सागर निकम (नृत्य), योगेश चौधरी (रंगभूषा), लक्ष्मी विसपुते (वेशभूषा) यांनी सांभाळली.
पिशवी (सुबोध बहु.युवा विकास प्रतिष्ठान, जळगाव)
भारतासारख्या विकसनशील देशात विकास होत असला तरी गरीबी आणि श्रीमंतीमधील दरी तशीच आहे. मुलांना शिक्षणाचा हक्क असणार्‍या या देशात बरीच मुले परिस्थितीमुळे शिक्षण घेवू शकत नाही. अशाच पोटाची खळगी भरण्यासाठी भंगार गोळा करणार्‍या चार मुलांची ही कथा मांडणारे हे बालनाट्य. या मुलांमधील घट्ट मैत्रीचे नातेच त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देते. देशाचा विकास हा मुलांच्या विकासावर आधारित असतो हा संदेश देणार्‍या या बालनाट्याचे लेखन रुपाली गुंगे यांनी तर दिग्दर्शन राज गुंगे यांनी केले होते. या बालनाट्यात रोहन पवार (सोन्या), निखिल शिंदे (मन्या), कनक पवार (सिंदी), प्राची लोहार (सानी), दिव्या कोळी (एक), चिन्मयी मुळीक (दोन) या बालकलावंतांनी भूमिका केल्या होत्या. तांत्रिक बाजू राजेश शहाणे (नेपथ्य), रुपाली गुंगे (प्रकाशयोजना), रुपेश जैस्वाल (पार्श्‍वसंगीत), सविता शिंदे (रंगभूषा) यांनी सांभाळल्या. किशोर शिंदे, सतिश शिंदे, बाळू बोरकर यांची रंगमंच व्यवस्था होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जेएनयू हल्ला: ओवेसींचे भाजपसह पोलिसांवर आरोप

Next Post

26/11 च्या मुंबई हल्ल्याचीच आठवण आली, जेएनयूवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंची प्रतिक्रिया

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
26/11 च्या मुंबई हल्ल्याचीच आठवण आली, जेएनयूवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंची प्रतिक्रिया

26/11 च्या मुंबई हल्ल्याचीच आठवण आली, जेएनयूवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंची प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us