Jalgaon Top 10 News Today जळगाव जिल्ह्यातील टॉप 10 ताज्या व महत्त्वाच्या बातम्या वाचा. गुन्हे, राजकारण, अपघात, हवामान आणि जिल्ह्याची अपडेट्स एका ठिकाणी.
विषारी औषध प्राशन करून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; GMC मध्ये उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
जळगाव – पिंपळगाव कमानी (ता. जामनेर) येथील पवन धर्मा राठोड (वय २६) या तरुणाने पिकांवरील फवारणीसाठी वापरले जाणारे विषारी औषध ९ जुलै रोजी प्राशन केले होते. त्यानंतर त्याला उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार ; १५ वर्षीय मुलगी गर्भवती
जळगाव : १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून २० वर्षीय तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. यातून ही मुलगी गर्भवती राहिली. गेल्या एक वर्षापासून हा तरुण स्वतःच्या घरासह मुलीच्या घरी तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करीत होता. या प्रकरणी निखिल लीलाधर कोळी (२०, रा. आसोदा रोड) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले आहे.
शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरातील १५ वर्षीय मुलगी शिक्षण घेत असून, तिच्याशी निखिल कोळी याने ओळख निर्माण केली. त्यानंतर, तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि तो तिच्या घरी येत राहिला. या दरम्यान, त्याने स्वतःच्या घरी आणि मुलीच्या घरी तिच्यावर अत्याचार केला. यातून ती मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिली आहे. हा प्रकार समजल्यानंतर मुलीच्या आईने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात मध्यरात्री चोरी; रोख रक्कम व एनव्हीआरसह 1.05 लाखांचा मुद्देमाल लंपास
जळगावातील गोदावरी आयएमआर महाविद्यालयाच्या लेखापाल विभागात १८ जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून तब्बल एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासह लेखापाल विभागाचा दरवाजा उघडून विद्यार्थ्यांकडून जमा झालेली एक लाख रुपये रोख रक्कम व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा एनव्हीआर चोरी केला.

घटनास्थळी दस्ताऐवज, फाईल्स अस्ताव्यस्त फेकून नुकसानही करण्यात आले. विशेष म्हणजे, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यामध्ये एक जण बाहेर लक्ष ठेवताना आणि दोन जण आत चोरी करताना दिसून येत आहेत. सर्वांनी तोंडाला रुमाल बांधलेला असल्याचे आढळले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघूर धरण परिसरात वृद्धाचा गळफास घेतलेला मृतदेह; कुटुंबियांचा घातपाताचा संशय
जळगाव तालुक्यातील कंडारी शिवारातील वाघूर धरण परिसरात भिमराव रामदास परदेशी (वय ७४) या वृद्धाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टेम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

बांधकाम स्थळी विजेचा धक्का लागून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू; अमळनेरमध्ये हृदयद्रावक घटना
अमळनेर येथे १९ जुलै रोजी बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने विनायक नानू उईके (वय २०, रा. अमळनेर) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विजेचा जोरदार झटका लागल्यानंतर त्याला तात्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
भुसावळ तालुक्यात २७ वर्षीय तरुणाची आत्महत्या; गळफास लावून जीवन संपवलं
जळगाव जिल्ह्यातील पिंप्रीसेकम (ता. भुसावळ) येथे राहत्या घरात गळफास घेऊन गणेश चंद्रकांत तायडे (वय २७) यांनी आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना पिंप्रीसेकम येथे घडली असून, गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना भुसावळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Jalgaon Latest News : संशयाचं भूत डोक्यात शीरलं, रक्तरंजित शेवट ; पतीकडून पत्नीचा खून!
जळगाव जिल्ह्यातील एका गावात वैवाहिक वादातून संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पतीने थेट पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संशयाच्या भूताने पछाडलेल्या पतीने घरातच पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीस ताब्यात घेतले आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आरोपी अटकेत आहे.

रावेरात पालघरची पुनरावृत्ती टळली – Jalgaon Latest News
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात पालघरसारखी घटना घडण्याची शक्यता होती. साधू वेशात असलेल्या दोन व्यक्तींवर “मुलं पळवणारे” असल्याचा संशय घेऊन ग्रामस्थांनी त्यांना पकडून मारहाण केली. ही घटना नेमकी पालघर घटनेची आठवण करून देणारी ठरली. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून त्या दोघांना जमावाच्या तावडीतून सोडवले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. यामुळे मोठा अनुचित प्रकार टळला असून पोलीस प्रशासनाची तत्परता आणि नागरिकांचा संयम यामुळे Jalgaon latest news मध्ये ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
हनीट्रॅप प्रकरणात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याची अटक
जामनेर विधानसभा प्रांतातील प्रफुल्ल लोढा या भाजपात नव्याने प्रवेश करणाऱ्या नेत्याविरोधात हनीट्रॅप प्रकरणात पोलिसांनी अटक केली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .
टीओडी मीटर पोस्टपेड व मोफत
ग्राहकांच्या वीजबिलांच्या तक्रारी कमी होणार
जळगाव : ग्राहकांना अचूक व वेळेत वीजबिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक टीओडी वीजमीटर राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे जळगाव जिल्ह्यातही बसविण्यात येत आहेत. हे मीटर नवतंत्रज्ञानावर आधारित असून तांत्रिकदृष्ट्या ते अधिक स्मार्ट स्वरूपाचे असले तरी ते प्री-पेड नसून, पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतरच ग्राहकांना वीजबिले मिळणार आहेत. हे मीटर मोफत बसवण्यात येत असून, ग्राहकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. यात मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही. प्रगतशील तंत्रज्ञानाचा वापर वीजक्षेत्रात होणे ही काळाची गरज आहे.
ऑटोमॅटिक मीटर रीडिंगमुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर बिले मिळतील. त्यामुळे वीजबिलाच्या संदर्भाने होणाऱ्या ग्राहक तक्रारीतही कपात होईल. सद्यस्थितीत कृषी वर्गवारी वगळता इतर सर्व वर्गवारीतील ग्राहकांना टीओडी मीटर बसविण्यात येत आहेत. जळगाव परिमंडलात एनसीसी या एजन्सीला मीटर बसविण्याचे काम देण्यात आले असून सुरुवातीच्या काळात सरकारी कार्यालये, सरकारी निवासस्थाने, मोबाईल टॉवर, नादुरुस्त मीटरच्या ठिकाणी हे टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत.

नवीन वीजजोडणी देतानाही टीओडी मीटर बसविण्यात येत असून, सोलार नेट मीटरिंगसाठीही त्याचा वापर करण्यात आला आहे. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात 85 हजार टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत.
महावितरणच्या नव्या वीजदर प्रस्तावात ग्राहकाने वीज कधी वापरली त्या वेळेनुसार दरात सवलत देण्यात येणार आहे. टीओडी मीटर असल्याशिवाय ही सवलत मिळू शकणार नाही. त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने टीओडी मीटर आवश्यकच आहे.
नव्याने बसविण्यात येणारे वीजमीटर अत्याधुनिक व स्मार्ट स्वरुपाचे असले तरी ते प्री-पेड नाहीत किंवा ते बसविण्यासाठी व मीटरची किंमत म्हणून ग्राहकांकडून कुठलेही शुल्क आकारले जात नाही. ग्राहकाने वापरलेल्या विजेची अचूक नोंद घेऊन योग्य वीजबिल देण्यास हे मीटर उपयुक्त ठरणार आहेत.
त्यामुळे वीज ग्राहकांनी टीओडी मीटर बसविण्याकामी महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भुसावळ येथे आज लोकशाही दिनाचे आयोजन – जनतेच्या तक्रारींचे तात्काळ
जळगाव, –सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांचे तात्काळ निरसन करण्यासाठी शासनामार्फत प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन राबविण्यात येतो. या उपक्रमाच्या अंतर्गत नागरिकांच्या तक्रारींना तत्काळ व न्याय्य तोडगा मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच मंत्रालय स्तरावरही हा दिन साजरा केला जातो. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
त्या अनुषंगाने दिनांक २१ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता तहसील कार्यालय भुसावळ येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पुढेही दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसीलदार भुसावळ यांच्या दालनात हा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येणार आहे.
तरी नागरिकांनी या दिवशी हजर राहून स्वतःच्या तक्रारींचे निवेदन सादर करून त्या तक्रारींचे तात्काळ निरसन करून घ्यावे, असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?
संशयाचं भूत डोक्यात शीरलं, रक्तरंजित शेवट ; पतीकडून पत्नीचा खून!
Instagram friendship rape case | सोशल मीडियावरचा साप! इंस्टाग्रामवर ओळख, अल्पवयीन मुलीवर अत्याचार!
WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध
PM Kisan Samman Nidhi: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 20 वा हप्ता – तुमचं नाव यादीत आहे का?
Oppo Reno 15 Pro 5G मोबाईल Launched in India ;108MP Camera, 8000mAh Battery फक्त ₹13,999 मध्ये!
Jalgaon news : आमच्या मुलीला गळफास देऊन मारलं? आईचा अश्रूंनी भरलेल्या आवाजात आक्रोश!
“Supreme Court ची थेट विचारणा – ‘हॉटेलमध्ये वारंवार गेलीस कशासाठी?’”
Lumpy Skin Disease Alert in Jalgaon – जळगाव जिल्ह्यात लंपीचा धोका वाढतोय
Maharashtra Teacher Quality Award | आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नवे निकष!
Maratha Reservation | मराठा आरक्षण अंतिम सुनावणी, मोठी अपडेट वाचा
Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी
Illegal Relationship Murder |मुंबईत वाद, डेटिंगमुळे हत्या : वाढत्या गुन्हेगारीने वाढतेय चिंता
Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?
आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही १५०० रुपये
‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड
Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा