राजपूत परंपरा ही शौर्य, स्वाभिमान, आणि बलिदानासाठी ओळखली जाते. (Adv.Shilabhabi Gogamedi Leadership) या परंपरेला आजच्या युगातही तितक्याच ताकदीनं जपणं आणि पुढे नेणं ही मोठी जबाबदारी असते. ही जबाबदारी पेलणं सोपं नाही, पण ज्यांच्या अंगी धैर्य आणि समाजभान यांचा संगम आहे, त्या स्त्रियाच हे करू शकतात.(Adv.Shilabhabi Gogamedi Leadership)

आज आपण बोलतोय अशाच एका झंझावाती स्त्री नेतृत्वाविषयी – अॅड. शिलाभाभी सुखदेवसिंह गोगामेडी.(Adv.Shilabhabi Gogamedi Leadership) पतीच्या – म्हणजे श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी यांची दोन वर्षांपूर्वी निर्घृण हत्या झाली. ही घटना राजपूत समाजाला हादरवणारी ठरली. पण या अंधारातून एक प्रकाशकिरण बाहेर आला तो म्हणजे शिलाभाभींच्या नेतृत्वाचा.
शौर्य, संयम आणि संकल्पाचा संगम
पतीच्या हत्येनंतरही डगमग न होता, अश्रू पुसून त्यांनी कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली. राजपूत समाजाच्या संघटनासाठी, आत्मगौरवासाठी आणि प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी दौरे सुरू केले.
अलीकडेच जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र दौऱ्यात त्यांच्या नेतृत्वाची झलक दिसली. शिलाभाभी जिथे जातात तिथे केवळ भाषण नव्हे, तर संघटन बांधणी, शिस्तबद्ध सैनिक घडवणं आणि समाजामध्ये आत्मसन्मानाची भावना निर्माण करणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट असतं.
वाघीणीच्या उपमेला योग्य उत्तर
शिलाभाभी यांना ‘वाघीण’ ही उपमा देणं अतिशयोक्ती ठरणार नाही.Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community त्यांचं नेतृत्व पाहता इतिहासातील राणी लक्ष्मीबाई, पद्मावती, महाराणी ताराबाई, झलकारी बाई यांची आठवण होते. या सर्व स्त्रियांनी पुरुषप्रधान समाजात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करतं स्वराज्यासाठी लढा दिला.राणी लक्ष्मीबाई जशी झाशीच्या सिंहासनावर झळकली, तसेच शिलाभाभी आज राजपूत समाजाच्या खंबीर नेतृत्वाचं प्रतीक ठरल्या आहेत.
समाजासाठी नवसंजीवनी
शिलाभाभींच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यांच्या आगमनाने जळगाव जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. त्यांची भाषणशैली, स्पष्ट दृष्टिकोन आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद यामुळे समाजातील तरुण वर्ग पुन्हा संघटनेच्या कार्यात सहभागी होऊ लागला आहे.
शिलाभाभींचं नेतृत्व केवळ राजपूत समाजापुरतं मर्यादित न राहता, देशपातळीवर महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय लिहू शकतं, अशी अपेक्षा आहे. त्यांचं धैर्य, नैतिक मूल्यं, आणि सेवा भाव हे आजच्या राजकारणात दुर्मिळ ठरत चालले आहेत.शिलाभाभी सुखदेवसिंह गोगामेडी यांनी दाखवलेलं धैर्य हे इतिहासातील झळाळत्या पानांसारखं आहे. त्यांच्या कार्यातून आजच्या पिढीने राजपूत परंपरेचा अभिमान, महिला नेतृत्वाची ताकद आणि संघटनाचं महत्त्व शिकावं.
शिलाभाभी म्हणजे एका युगाची सुरुवात… एका वाघीणीची झेप… आणि समाजाच्या नवसंजीवनाची पहाट!
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन ; रक्तदान शिबिरासह मोफत औषधी वाटप