ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाचे मानले जाहीर आभार ; अवैध धंदेचालकांना दिला दणका !
जळगाव ;- गेल्या ३० -३५ वर्षांपासून तालुक्यातील कुसुंबा येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या हातभट्टीची रसायनयुक्त दारू विकली जात होती . तसेच यामुळे स्त्रियांना मानसिक त्रास होऊन त्यांचे संसार उघड्यावर पडण्यास सुरुवात झाली होती . काही गेल्या हातभट्टी दारू बंद होत नव्हती . मात्र एमआयडीसीचे तात्काळी प्रभारी पोलीस निरीक्षक अनिरुद्ध आढाव यांनी पीएसआय संदीप पाटील यांना कुसुंबा शिवाराची धुरा सप्टेंबर २०१८ मध्ये दिली होती .
तसेच सध्याचे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनीही हि धुरा कायम ठेवली आहे. संदीप पाटील यांनी टप्प्याटप्प्याने अवैध धंदे चालकांना दणका देऊन हातभट्ट्याची निर्मिती केंद्रे उध्वस्थ केली . त्यामुळे आता कुसुंबे गाव हे हातभट्टी आणि जुगारमुक्त झाल्याने संदीप पाटील यांच्या सारखा तरुण अधिकारी ‘सिंघम’ सारखा धावून आल्याने सरपंच , पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थ खासकरून महिला वर्गाने निवेदन देऊन पोलीस प्रशासनाचे जाहीर आभार मानून इतर ठिकाणीही अशाप्रकारे अवैध दारू बंद करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
वाचा सविस्तर खालील लिंकवर
35 – 40 वर्षापासून कुसुंबे गावात हातभट्टी/ सट्टा/जुगार/टिकली भवरा / देहविक्री अशा प्रकारे व्यसनांना तरुण आहारी गेले होते. गावठी दारुतील शरीराला घातक रसायनमुळे गावातील 60 – 70 तरुण मयत झालेले आहेत. व अन्य 20 – 25 तरुणांना याची बाधा झालेली आहे.ते तरुण आता त्यापासून बचावले आहेत.हातभट्यांच्या दारुमुळे अनेक स्ञियांना तारुण्यांत विधवा पणाला सामोरे जाऊन संसार उद्धवस्त झालेले आहेत. या प्रकाराला गावातील सर्वच नागरीक ञासून गेलेले होते. याबाबतीत गावकऱ्यांनी वेळोवेळी ग्रामसभांमध्ये ठराव घेऊन सदरचे ठराव तसेच गावातील महिलांच्या सहीचे विनंती अर्ज प्रशासनास देवून 2014 सालापासून दारूबंदीबाबत विनंती अर्ज केले परंतू प्रशासनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नव्हता.पीएसआय संदिप पाटील यांनी कुसुंबे,रायपूर, चिंचोली ,धानवड या गावात व उजाड कुसुंबे गावापासून 2.5 किलोमिटर असलेले उजाड कुसुंबे जंगली भागात वेळोवेळी हातभट्ट्या उद्धवस्त करून कार्यवाही करुन धाड सञ सुरुच ठेवले परिणामी गावातील हातभट्टी ची दारू तसेच इतर अवैध धंदे यांवर वचक निर्माण झाला असुन गेले 35-40 वर्षापासून होणाऱ्या ञासापासून गावकऱ्यांची मोठया प्रमाणात सुटका झाली आहे. काही तरुण नशा करुन भरवस्तीत लघुशंका करत. 40 फुटी रोड इंदिरा नगर या गल्लीतून रघूवीर समर्थ या बैठक जप कार्यासाठी 400-450 महिला दर बुधवार व रविवारी जात असतात.या महिलांना गेल्या 7 -8 वर्षापासून या ञासाला सामोरे जावे लागत होते. पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे आज त्या माता भगीणींचा त्रास बंद झाला आहे. तसेच कुसुंबा गावातील गावठी दारु विक्री ,सट्टा, जुगार,भवरा टिकलीही बंद आहे आणि ते कायम स्वरुपी बंदच राहावा. पोलीस प्रशासनाच्या कारवाईमुळे गावात उत्साहाचे वातावरण आहे.
गावातील रघु,सुनील कोळी,पंढरी आदी नावांच्या माणसांच्या हातभट्ट्यांवर मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग दारू प्यायला जायचा . मात्र संदीप पाटील यांच्या कारवाईमुळे हातभट्टी चालकांनी आपापले धंदे बंद करून सत्मार्गाला लागले . तब्बल १५ पेक्षाही जास्त कारवाया गुप्त माहिती मिळाल्यावर पीएसआय संदीप पाटील यांनी केल्या. . अशा कर्तव्यतत्पर अधिकार्याचा जाहीर साकार व्हावा आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानावेत यासाठी ग्रामस्थांतर्फे अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले . पीएसआय संदीप पाटील यांचे कौतुक होत आहे.
गावात दारूच्या आहारी गेलेल्यांची संसारे उध्वस्थ झाली होती अनेकांचा मृत्यू झाल्याने स्त्रिया विधवा होऊन त्यांची मुले अनाथ झाल्याच्या घटना घडल्या होत्या . क्षुल्लक कारणावरु गावात भांडणे व्हायची . अनेकवेळा हाणामाऱ्या, प्राणघातक हल्ले याचे प्रमाणदेखील वाढले होते . मात्र गेल्या ८ महिन्यांपासून गाव हातभट्टी दारूमुक्त असून पीएसआय संदीप पाटील यांचा वचक असल्याने हे शक्य होऊ शकले . तरुण दारूपासून मुक्त झाल्याने गावात गुण्यागोविंदाचें वातावरण आहे.
दरोड्याच्या गुन्ह्यांसह अनेक गुन्ह्यांची उकल
पीएसआय संदीप पाटील यांच्याकडे धानवड -कुसुंबा हि बिट सोपविण्यात आली आहे . त्यांनी उमाळे शिवारात दरोड्याची घटना २४ तासात उकल करून चार जणांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या २ लाख ६ हजारांच्या मुद्देमालापैकी १ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल हा हस्तगत केला . तसेच रायपूर येथील निलेश दिलीप पाटील या गुन्हेगाराला तडिपारकरण्याकामी कार्य केले आहे . याशिवाय सट्टा ,पत्ता जुगारांवर वेळोवेळी धाडी टाकून गुन्हेगारांना अटक केली आहे . ४२० च्या गुन्ह्याची उकल देखील त्यांनी केली आहे . कमी कालावधीत अनेक लहान मोठे गुन्हे उघड करून आणि गुन्हेगार यांनाअटक करण्याची महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे पीएसआय संदीप पाटील यांचा परिसरातील गुन्हेगारांवर जबर वाचक बसल्याने मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना आळा बसला आहे.