जळगाव महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-४ यांच्या मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दिनांक २२ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात आली. या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्राप्त गुणांची यादी दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आली आहे
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची प्राप्त गुणांची यादी विद्यार्थ्यांना परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in/ या संकेतस्थळावर दि. ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी पासून पाहता येणार आहे.
या यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. १८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने गुणपडताळणी केली जात नाही. अशी माहिती आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.